शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५ मे रोजी  गोंदिया शहर परिसरात रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. कोविड-१९ आजारातील रुग्णांवर उपचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपी अमोल नितेश चौधरी (२१), रा. विठ्ठल- रुक्मिणी चौक, छोटा गोंदिया या रुग्णवाहिका चालकाला दोन रेमडेसिविर इंजेक्शनसह अटक केली आहे.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : बाहेकर हॉस्पिटलमधून येत होते बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारी रुग्णालयांमधून रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना न लावता तेच इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि.५) रंगेहाथ पकडले आहे. गोंदिया शहरातील नामांकित असलेल्या बाहेकर हॉस्पिटलमधून इंजेक्शन रुग्णांना न लावता बाहेर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५ मे रोजी  गोंदिया शहर परिसरात रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. कोविड-१९ आजारातील रुग्णांवर उपचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपी अमोल नितेश चौधरी (२१), रा. विठ्ठल- रुक्मिणी चौक, छोटा गोंदिया या रुग्णवाहिका चालकाला दोन रेमडेसिविर इंजेक्शनसह अटक केली आहे. तो  प्रत्येकी १५ हजार रुपयांत या इंजेक्शनची विक्री करीत होता. स्थानिक गुन्हे शाखेने बोगस ग्राहक पाठवून त्याला अडकविले. बाहेकर हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या अमोल चौधरी याच्याकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. त्याने हे इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्याकडून आणल्याचे सांगितले. सफाई कामगार संजय तुरकर याला विचारणा केल्यावर त्याने बाहेकर हॉस्पिटलमधील एका नर्सकडून आणल्याचे सांगितले. ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड,  पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे, सहायक फौजदार लिलेंद्रसिंह बैस, चंद्रकांत करपे, राजेंद्र मिश्रा, तुलसीदास लुटे, रेखलाल गौतम, इंद्रजित बिसेन, महेश मेहर, अजय राहांगडाले, विजय मानकर, संतोष केदार, महिला पोलीस शिपाई गेडाम यांनी केली आहे.  तिन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.च्या कलम ४२०, १८८, ३४, सहकलम २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

रुग्णांना इंजेक्शन न लावता जात होते काळ्याबाजारात विक्रीला बाहेकर हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका चालक अमोल नितेश चौधरी याने सफाई कामगार  संजय रमेश तुरकर, रा. छोटा गोंदिया यांच्याकडून ते इंजेक्शन आणले.  संजय तुरकरने ते इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटलधील नर्सकडून आणल्याचे सांगितले. हे तिन्ही कर्मचारी बाहेकर हॉस्पिटलमधील आहेत. अमोलच्या पँटच्या खिशातून दोन मिथिल प्रेडनिसोलोन सोडियम इंजेक्शन मिळून आले. त्याने रेमडेसिविर व मिथिल प्रेडनिसोलोन इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटलमधून आणल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसremdesivirरेमडेसिवीर