दोन मोबाईल टॉवर केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 05:00 IST2021-02-08T05:00:00+5:302021-02-08T05:00:02+5:30

देवरी नगर पंचायतीने आपल्या हद्दीत येणाऱ्या सर्व इमारती, घरे, व्यापारी दुकाने, शासकीय, अशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, मोबाईल टॉवर व उद्योगधंदे चालविणाऱ्या सर्व मालमत्ताधारकांना कर वसुलीबाबत मागणी पत्र दिले आहे. मात्र, त्यानंतरही कित्येकांनी अद्याप कर भरणा केली नाही. अशा लोकांकडून कर वसुली करण्याकरिता मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनात कर निर्धारण तथा प्रशासकीय अधिकारी विठ्ठल हजारे यांच्या नेतृत्वात कर वसुली अभियानाला जोरात सुरुवात करण्यात आली आहे.

Two mobile towers sealed | दोन मोबाईल टॉवर केले सील

दोन मोबाईल टॉवर केले सील

ठळक मुद्देनगर पंचायतीची कारवाई : मालमत्ता कर वसुली अभियानाला सुरुवात

लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरी ­: मालमत्ता कर वसुलीसाठी आता नगर पंचायतीने कंबर कसली असून, कर वसुली अभियानाला जोमात सुरुवात केली आहे. यांतर्गत नगर परिषदेने मालमत्ता थकबाकी असलेले २ मोबाईल टॉवर सील केले आहेत.  
देवरी नगर पंचायतीने आपल्या हद्दीत येणाऱ्या सर्व इमारती, घरे, व्यापारी दुकाने, शासकीय, अशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, मोबाईल टॉवर व उद्योगधंदे चालविणाऱ्या सर्व मालमत्ताधारकांना कर वसुलीबाबत मागणी पत्र दिले आहे. मात्र, त्यानंतरही कित्येकांनी अद्याप कर भरणा केली नाही. अशा लोकांकडून कर वसुली करण्याकरिता मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनात कर निर्धारण तथा प्रशासकीय अधिकारी विठ्ठल हजारे यांच्या नेतृत्वात कर वसुली अभियानाला जोरात सुरुवात करण्यात आली आहे. यांतर्गत, पथकाने मंगळवारी (दि. २) शहरातील प्रभाग क्रमांकमध्ये असलेल्या टाटा इंडिकाॅम मोबाईल टॉवरला सील ठेकले आहे. त्यांच्याकडे ३८ हजार १३३ रुपयांची थकबाकी आहे. प्रभाग क्रमांक ११मधील विजन इंडिया प्रायवेट लिमिटेडचे टॉवर सील केले. त्यांच्याकडे ८३ जार ८६६ रुपयांची अशी एकूण एक लाख २१ हजार ९०० रुपयांची थकबाकी आहे. 
ही कारवाई प्रशासकीय अधिकारी विठ्ठल हजारे, लिपिक वामनराव फुन्ने, देवचंद बहेकार, इरफान शेख, प्रवीण वाटकर, संजू कानेकर व शिपाई अरुण धारगावे यांंनी केली. या कारवाईमुळे शहरातील सर्व थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

 

Web Title: Two mobile towers sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल