भीषण अपघातात दोन ठार
By Admin | Updated: January 25, 2016 03:12 IST2016-01-25T03:12:59+5:302016-01-25T03:12:59+5:30
तिरोड्यावरून गोंदियाकडे जात असलेल्या एका कारची दुचाकीला समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे

भीषण अपघातात दोन ठार
तिरोडा (गोंदिया) : तिरोड्यावरून गोंदियाकडे जात असलेल्या एका कारची दुचाकीला समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडला.
प्राप्त माहितीनुसार, चारचाकी इको फोर्ड कार (एमएच ३५, पी ५९१९) ही तिरोडावरून गोंदियाकडे जात असताना काचेवानीजवळील सय्यक फार्म हाऊसजवळ महेश असाटी यांच्या शेताजवळ सेजगाववरून येणाऱ्या दुचाकी (एमएच ३१, एएन २८२५) ला कारची जबर धडक बसली. यात दुचाकीवर बसलेले बयेवाडा येथील प्रवीण प्रल्हाद मलेवार (२८) आणि झाकीर हुसेन वॉर्ड तिरोडा येथील विनोद जीवलग साखरे (४२) यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय कारमध्ये असलेले धर्मेश अग्रवाल (३५) रा.गोंदिया व देवीलाल सुलाखे (३५) रा.मुंडीपार यांना तिरोड्याच्या उपजिल्हा रुग्णालयातून गोंदियाला हलविण्यात आले.
याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ अ, ३३७, ३३८ तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंद केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)