दोन तास तडफडला जळीत रूग्ण
By Admin | Updated: April 26, 2015 01:11 IST2015-04-26T01:11:19+5:302015-04-26T01:11:19+5:30
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात जळलेला रूग्ण उपचारासाठी दाखल झाला असता त्याच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही.

दोन तास तडफडला जळीत रूग्ण
गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात जळलेला रूग्ण उपचारासाठी दाखल झाला असता त्याच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. यामुळे तब्बल दोन तास तो रूग्ण तडफडत राहीला. २५ एप्रिलच्या सकाळी ११ वाजता दरम्यान घडलेल्या या प्रकारात दुपारी १.३० वाजता त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
काटी येथील कांतीलाल तेजलाल मरठे (३०) जळाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आला. त्यांनतर २५ एप्रिल रोजी सकाळी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी त्यांना आणले.
एका रूग्णावाहिकेने त्यांना आणल्यावर त्यांची चिठ्ठी काढण्यात आली व डॉक्टरांनी आकस्मिक विभागात जाण्याचा सल्ला दिला. आकस्मिक विभागात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना कुठेही बसून जा असा सल्ला दिला. यावर ते तेथेच बसून राहिले मात्र तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ लोटूनही त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही. त्यांच्या सोबत पत्नी बिंदू व आत्या रामप्यारी होत्या. मद्याच्या धुंदीत त्याने स्वत:वर रॉकेल टाकून जाळल्याचे कांतीलालने सांगितले. (तालुका प्रतिनिधी)