दोन दिवसात विविध ठिकाणी ११ दारूविक्रेत्यांना अटक

By Admin | Updated: October 4, 2014 23:29 IST2014-10-04T23:29:18+5:302014-10-04T23:29:18+5:30

गोंदिया जिल्हा पोलिसांनी मागील दोन दिवसात ११ जणांना अटक केली आहे. गुरूवारी डुग्गीपार पोलिसांनी बोडवीटोला (दल्ली) येथील सुरजलाल रतिराम मडावी (६०) याला १४ देशी दारूच्या

In two days, 11 liquor buyers arrested at different places | दोन दिवसात विविध ठिकाणी ११ दारूविक्रेत्यांना अटक

दोन दिवसात विविध ठिकाणी ११ दारूविक्रेत्यांना अटक

गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलिसांनी मागील दोन दिवसात ११ जणांना अटक केली आहे. गुरूवारी डुग्गीपार पोलिसांनी बोडवीटोला (दल्ली) येथील सुरजलाल रतिराम मडावी (६०) याला १४ देशी दारूच्या पव्यासह अटक करण्यात आली.
आमगाव पोलिसांनी बनगाव येथील सुनिल तिलकचंद बघेल (३५) याचकडून १० नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. आमगावच्या चावडी बाजारातील शाम कुंजीलाल खांडेकर (४०) याचकडून ८ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. गंगाझरी पोलिसांनी चुटीया येथील अनिता अनिल डोंगरे (४५) याचकडून ६७ देशी दारूचे पव्वे व १० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
शुक्रवारी सावरीटोला येथील छोटेलाल संजू उपवंशी (५०) याचकडून १० देशी दारूचे पव्वे, बनाथर येथील परसराम मलेश बडगेवार (२८) याचकडून ३० नग देशी दारूचे पव्वे, देवरी पोलिसांनी टेकाबेदर येथील परसराम बाळकिशन गदमवार (४५) व राजू हुमन घरत (२९) या दोघांजवळून ६ देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. रामनगर पोलिसांनी येथील कटंगीकला येथील चंद्र्रप्रभा प्रतिलाल मेश्राम (५७) याचकडून १५ देशी दारूचे पवञवे, २० लिटर हातभट्टीची दारू, सालेकसा पोलिसांनी गोवारीटोला येथील मुलचंद श्रीचंद मोहारे (४२) याचकडून ४० नग देशी दारूचे पव्वे, लटोरी येथील गुलाब ब्रिजलाल मच्छीरके (४२) याचकडून ६ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले. सदर आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: In two days, 11 liquor buyers arrested at different places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.