ख़ड्ड्यामुळे घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST2021-09-10T04:36:16+5:302021-09-10T04:36:16+5:30
आमगाव-कामठा राज्य महामार्गाचे खड्ड्यात रूपांतर झाले आहे. याच खड्ड्यात तालुक्यातील ग्राम टेकरी येथील जितेंद्र रंगारी (३५) व भूरेलाल बिसेन ...

ख़ड्ड्यामुळे घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार दोघे जखमी
आमगाव-कामठा राज्य महामार्गाचे खड्ड्यात रूपांतर झाले आहे. याच खड्ड्यात तालुक्यातील ग्राम टेकरी येथील जितेंद्र रंगारी (३५) व भूरेलाल बिसेन (४५) हे दुचाकी क्रमांक एमएच ३५ एके २५०६ ने आमगाव कडे येत असताना पडले गंभीर जखमी झाले. नागरिकांनी १०८ ॲम्बुलेन्स बोलावून त्यांना गोंदिया येथे उपचारासाठी दाखल केले. या राज्य महामार्गावर खड्ड्यांमुळे निरंतर नागरिकांना अपघातांना समोरे जावे लागत आहे. रस्ते दुरुस्ती व नवीन बांधकामासाठी नागरिकांनी यापूर्वी आंदोलन ही केले. परंतु पोकळ आश्वासनांपुढे सर्व निरंक आहे. रस्ते महामार्ग बांधकामासाठी जनप्रतिनिधींची उदासीनता जनतेला मृत्यूच्या दारात उभे करीत आहे. खड्ड्यांमुळे जनतेला अद्यापही सुटका दिसत नाही. त्यामुळे हा महामार्ग किती नागरिकांचा बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.