दोन घटनांत ८.५० लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: April 27, 2015 00:38 IST2015-04-27T00:38:07+5:302015-04-27T00:38:07+5:30
तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथे लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांचे दागिने तर सालेकसा येथील सराफा दुकान फोडून

दोन घटनांत ८.५० लाखांचा ऐवज लंपास
सराफा दुकान फोडले : पाहुण्यांचे दागिने केले लंपास
गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथे लग्न समारंभात आलेल्या पाहुण्यांचे दागिने तर सालेकसा येथील सराफा दुकान फोडून अशा दोन घटनांत चोरट्यांनी आठ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. तिरोडा तालुक्याच्या वडेगाव येथून अज्ञात चोरट्यांनी मंगळवार ते बुधवार दरम्यान चार लाख २६ हजार ८०० रूपयाचा माल पळविण्यात आला.
वडेगाव निवासी अनंत जायस्वाल यांच्या घरी लग्न समारंभासाठी गणेश जियालाल जायस्वाल (६२, परासिया, मप्र) पत्नी सुशीला व साळी लक्ष्मी यांच्या सोबत आले होते.
त्यांचे दागिने सुटकेसमध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी मंगळवार ते बुधवार दरम्यान दरवाजे उघडे असल्याचे संधी साधून त्यांच्या सुटकेश मधील सदर दागिणे लंपास केले. चोरीच्या गेलेल्या दागिन्यांमध्ये ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कंगण किंमत एक लाख ३० हजार, ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र किंमत एक लाख ३० हजार, ४० ग्रॅम वजनाचा लांब हार किंमत एक लाख चार हजार, १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत २६ हजार, आठ गॅ्रम वजनाचे दोन नग सोन्याचे टाप्स किंमत १३ हजार, चांदीच्या तोरड्या व बिछीया किंमती ३०० रूपये असा एकूण चार लाख २६ हजार ८०० रूपयांचा माल आहे. तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसऱ्या घटनेत, शनिवारी रात्री दरम्यान सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत दरेकसा रस्त्यावरील लक्ष्मीप्रसाद सोनी यांच्या सराफा दुकानाच्या शटरला गठ्ठा करून कडी काढली व दुकानातून चार लाख २४ हजार ९१६ रूपये किंमतीचे दागिने व पाच हजार रूपये रोख पळवून नेले. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी सालेकसा येथील एक अधिकारी व एक कर्मचारी आमगाव पोलीस ठाण्यात आले होते.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्यांचा सुगावा लावण्यासाठी त्यांनी रात्रीच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. (तालुका प्रतिनिधी)