दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST2021-03-22T04:26:17+5:302021-03-22T04:26:17+5:30

गोंदिया : मागील अनेक दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील दुचाकी चोरीला जात आहे. या टोळीच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस होते. ...

Two bike thieves arrested | दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक

दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक

गोंदिया : मागील अनेक दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील दुचाकी चोरीला जात आहे. या टोळीच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस होते. पोलिसांनी या दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून तीन दुचाकी जप्त करण्यात आले. ही कारवाई २० मार्च रोजी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना चुलोद येथील आरोपी सचिन ऊर्फ सोनू ठाकूर व आनंद राहांगडाले या दोघांची माहिती मिळाली.

माया सचिन ऊर्फ सोनू ऊर्फ जिकी दुर्योधन ठाकूर (२१, रा. चुलोद) व आनंद राहांगडाले (रा. चुलोद) याच्यासोबत मिळून तीन दुचाकी चोरी केल्या होत्या. त्यापैकी दोन दुचाकी त्याने त्याचे घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. या आरोपींनी चोरी केलेल्या एम.एच.३५ व्ही १२२७ किंमत ४० हजार, विनाक्रमांकाची दुचाकी किंमत ६० हजार, जुना एक मोबाइल असा एक लाखाचा माल, आरोपी आनंद सुखदेव रहांगडाले (२१, रा. चुलोद) याच्या घरून एक दुचाकी ( एम.एच.३५ क्यू ८४४६) किंमत ३० हजार व एक मोबाइल असा एकूण ३६ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या दोघांसंदर्भात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, पोलीस हवालदार भुवन देशमुख, अर्जुन कावळे, पोलीस नायक महेश मेहर, रेखलाल गौतम, पोलीस शिपाई अजय राहांगडाले यांनी केली आहे.

Web Title: Two bike thieves arrested