दोन झाले बरे, तीनची पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST2021-09-18T04:31:34+5:302021-09-18T04:31:34+5:30
गोंदिया : आठ दिवसांच्या कालावधीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा थोडी वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि.१७) गोंदिया तालुक्यात तीन बाधितांची भर ...

दोन झाले बरे, तीनची पडली भर
गोंदिया : आठ दिवसांच्या कालावधीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा थोडी वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि.१७) गोंदिया तालुक्यात तीन बाधितांची भर पडली, तर दोन बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोराेना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ झाली.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी ३१२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २३२ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ८० नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ३ नमुने कोरोनाबाधित आढळले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.९ टक्के होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४५०९१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २३०६६५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २२०२५२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२१४ नमुने कोरोनाबाधित आढळले. यापैकी ४०५०४ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यातील आठपैकी गोंदिया वगळता उर्वरित सातही तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.
........
प्रतिबंधात्मक नियमांचे करा पालन
आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे, तर दुसरीकडे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव वाढू द्यायचा नसेल तर सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे, तरच तिसऱ्या लाटेला रोखता येणे शक्य आहे.
..............
७० टक्के लसीकरण पूर्ण
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. सद्य:स्थितीत १२५ केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण १२ लाख ६५ हजार नागरिकांचे लसीकरण करायचे असून यापैकी आतापर्यंत ९ लाख ३१५८० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ७० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.