तीन घरफोडीतील दोन आरोपींना अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST2021-04-29T04:22:02+5:302021-04-29T04:22:02+5:30
गोंदिया : शहरातील रामनगर, गोंदिया ग्रामीण व गोंदिया शहर या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक ...

तीन घरफोडीतील दोन आरोपींना अटक ()
गोंदिया : शहरातील रामनगर, गोंदिया ग्रामीण व गोंदिया शहर या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २७ एप्रिल रोजी अटक केली.
जितेंद्र ऊर्फ लड्डू नरेंद्रसिंह तोमर (२८) रा. टप्पा मोहल्ला संत कबीर वाॅर्ड भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याच प्रकरणात गोंदियाच्या गौतमनगरातील एका १५ वर्षाच्या विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. आरोपी जितेंद्र ऊर्फ लड्डू नरेंद्रसिंह तोमर व त्या विधिसंघर्षग्रस्त बालकावर गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अशा तीन गुन्ह्यात त्या दोघांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह पांडुरंग शिंदे, सहायक फौजदार गोपाल कापगते, लीलेंद्र बैस, चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, अर्जुन कावळे, भुवनलाल देशमुख, पोलीस नायक महेश मेहर, रेखलाल गौतम, तुलसीदास लुटे, इंद्रजित बिसेन, नेवालाल भेलावे, पोलीस शिपाई विजय मानकर यांनी आरोपी जितेंद्र ऊर्फ लड्डू नरेंद्रसिंह तोमर (२८) रा. टप्पा मोहल्ला संत कबीर वाॅर्ड भंडारा याला सौंदड रेल्वेस्टेशनजवळ सडक अर्जुनी येथून अटक केली आहे.