हाजराफॉलच्या वळणावर सुमो झाडावर आदळली
By Admin | Updated: July 9, 2016 02:00 IST2016-07-09T02:00:34+5:302016-07-09T02:00:34+5:30
सालेकसा-दर्रेकसा मार्गावरील हाजराफॉल नजीकच्या वळणावर चारचाकी वाहन झाडावर आदळल्यामुळे सात जण जखमी झाले.

हाजराफॉलच्या वळणावर सुमो झाडावर आदळली
सात जण जखमी : सर्व जखमी सोनीतील रहिवासी
सालेकसा : सालेकसा-दर्रेकसा मार्गावरील हाजराफॉल नजीकच्या वळणावर चारचाकी वाहन झाडावर आदळल्यामुळे सात जण जखमी झाले.
चालकाच्या डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. इतर सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात रेफर करण्यात आले.
जखमींमध्ये राधेश्याम वलचरे (५०), पांडुरंग नान्हे (४५), भुपेंद्र फुंडे (४०), अक्षय बावनकर (२२), जियालाल मौजे ४०), किसन मौजे (५०), भुमेश्वर मौजे (४५) यांचा समावेश आहे. हे सर्व सोनी येथील रहिवासी आहेत. दर्रेसाकडे जात असताना वळणावर ताबा सुटल्याने वाहन एका झाडावर जाऊन आदळले.