डिजिटल शाळेतील संगणक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:34 IST2017-09-11T22:34:06+5:302017-09-11T22:34:30+5:30

जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, वाचन कुटी, दप्तर विरहित दिन असे विविध उपक्रम घेतले जातात.

Turn off digital school computers | डिजिटल शाळेतील संगणक बंद

डिजिटल शाळेतील संगणक बंद

ठळक मुद्देपुढे पाठ-मागे सपाट : वीज बिल भरण्यासाठी होते गोची

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून ज्ञान रचनावाद, वाचन आनंद दिवस, प्रेरणा दिवस, वाचन कुटी, दप्तर विरहित दिन असे विविध उपक्रम घेतले जातात. खाजगी शाळातील विद्यार्थ्यांना लाजवेल अशा जि.प.च्या शाळा करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. शाळा डिजिटल झाल्याचा कांगावा होत असला परंतु मागील ७-८ वर्षापासून जि.प. शाळांना दिलेले संगणक संच धुळखात पडले आहेत.
एकीकडे शाळा डिजिटल करण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे. गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या संपूर्ण शाळा डिजीटल झाल्या. मात्र दुसरीकडे डिजीटल झालेल्या शाळा वीज बिल भरण्यासाठी असमर्थ ठरत असल्याने या शाळांतील संगणक संच मागील अनेक वर्षापासून धुळखात पडले आहेत. आमगाव तालुक्यात १९ शाळांमध्ये ३९ संगणक संच, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १८ शाळांमध्ये ४४ संच, देवरी तालुक्यातील १७ शाळांमध्ये ४६ संच, गोंदिया तालुक्यातील २७ शाळांमध्ये १०० संच, गोरेगाव तालुक्यातील २६ शाळांमध्ये ४७ संच, सालेकसा तालुक्यातील १७ शाळांमध्ये ४६ संच, सडक अर्जुनी तालुक्यातील २० शाळांमध्ये ३६ संच, तिरोडा तालुक्यातील २१ शाळांमध्ये ६४ संच देण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण उच्च माध्यमिक असलेल्या १६५ शाळांमध्ये ४२२ संच देण्यात आले.
मात्र यातील बहुतांश शाळांतील संगणक संच बंद पडून आहेत. विद्यार्थ्यांनी या संगणक संचांचा वापर करावा यासाठी शासनाने हे संच जिल्हा परिषदेच्या शाळांना दिले होते. परंतु हे संगणक संच एकदा बिघडल्यावर त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी नाही. संगणक वापरासाठी लागणारी वीज व त्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी पैसे देत नसल्याने हे संगणक संच मागील अनेक वर्षांपासून बंद पडले आहेत.
वीज बिल मुख्याध्यापकाच्या खिशातून
शाळांच्या विकासासाठी शासन सादिलवार राशी देते. परंतु ही राशी अत्यल्प प्रमाणात असल्यामुळे वर्षभरात शाळा चालविण्यासाठी लागणारा खर्च मुख्याध्यापकांना नाईलाजास्तव आपल्या खिशातून करावा लागतो. शासन देत असलेली सादिलवार राशी एका महिन्याच्या खर्चापुर्ती आहे. यंदा सादिलवार राशी मिळाली. परंतु यापुर्वी ५-७ वर्षापासून शाळांना सादिलवार राशी मिळाली नसल्याची ओरड आहे. एका शाळेला महिन्याभराचा वीज बिलाचा खर्च मोठ्या प्रमाणात येत असतो. वीज विभागही या शाळांना वीज बिल व्यावसायीक बिल म्हणून अधिकचे देते. घरुगुती वापरासाठी जे बिलाचे दर आहेत, ते दर शाळांना दिल्यास वीज बिलाचा भरना सहजरित्या होऊ शकेल. व्यावसायीक दराने वीज बिल देण्यात येत असल्यामुळे अनेक शाळांतील वीज बिल भरल्या जात नाही. परिणामी त्या शाळांतील वीज पुरवठा खंडीत केला जातो.

Web Title: Turn off digital school computers