तंमुसने लावले प्रेमी युगुलाचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:01 IST2017-09-20T22:00:55+5:302017-09-20T22:01:09+5:30
तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे आंतरजातीय प्रेमी युगलाचा विवाह सोहळा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमाने आणि दुर्गा उत्सव समिती व गावकºयांच्या सहकार्याने पार पडला.

तंमुसने लावले प्रेमी युगुलाचे शुभमंगल
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे आंतरजातीय प्रेमी युगलाचा विवाह सोहळा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमाने आणि दुर्गा उत्सव समिती व गावकºयांच्या सहकार्याने पार पडला. दोन्ही प्रेमवीर वेगवेगळ्या जातीचे असून त्यांचे प्रेमप्रकरण मोबाईलवरुन घडून आले. दोन वर्षानंतर ओळख पटली.
बेरडीपार (काचेवानी) येथील दुर्गा माता मंदिरात १८ सप्टेंबरला महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकारणे विवाह सोहळा पार पडला. मुलाचे नाव राजू लालचंद उके (२४) रा. बेरडीपार असून मुलीचे नाव दिपसरा जगदीश काळसर्पे (१९) रा. भानपूर ता. खैरलांजी, जि. बालाघाट असे आहे.
विवाह सोहळा सरपंच ज्योत्स्ना कमलेश टेंभेकर यांच्या अध्यक्षतेत, तंमुस अध्यक्ष धनराज पटले, पोलीस पाटील इंसराज कटरे, सुरेश झगेकार, भूवन कापसे, जयकुमार रिनाईत, पन्नालाल कटरे, प्रकाश ठाकरे, डॉ. गणेश कोल्हटकर, नारायण पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. लग्नाबाबत तंमुसने कागदोपत्री कारवाई पूर्ण करुन लग्न सोहळ्याची वेळ दिली. सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे मुलाचे मामा दिलीप तुमसरे तर वधूचे मामा म्हणून पोलीस पाटील हंसराज कटरे यांनी विधिवत मंगल कार्याप्रसंगी सहयोग केले. मंगळाष्टके अध्यक्ष धनराज पटले यांनी पूर्ण केले.
प्रेमी युगलांनी तंमुसला दिलेल्या बयानात सांगितले की, दोन वर्षापूर्वीपासून मोबाईलद्वारे एका दुसºयाचे संबंध जुडले. ते संबंध मोबाईलपर्यंतच टिकून राहिले. दोन वर्षात प्रत्यक्ष भेटी झाल्या नाहीत. राजू आणि दिपसरा यांची प्रत्यक्षात भेट तीन महिन्यांपूर्वी झाली. यातून या दोघांच्या प्रेमात खूप जवळीकता निर्माण झाली. दोघांनी जीवनसाथी बनण्याचा निर्णय घेतला. बेरडीपारचे तंमुस अध्यक्ष धनराजक पटले यांच्याशी संपर्क साधून दोघांनी इच्छा व्यक्त केली. यावर अध्यक्षांनी तातडीची सभा बोलावली.
दोघांच्या इच्छेप्रमाणे मुलीच्या भावाला व भाटव्याला सूचना देवून विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यास कळविण्यात आले. मात्र त्यांनी येण्यास नकार देत आपण लग्न करुन द्या किंवा त्यांच्या मर्जीने काही करा, असे उत्तर दिले. दोन्ही बालीक असल्याने विवाह सोहळ्याची मंजुरी देवून लग्न सोहळा पार पाडण्यात आला. यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घेतला.
लग्न सोहळ्याला सेवकराम रहांगडाले, व्यंकट चौधरी, नामेश्वर कटरे, राजेंद्र वाघाडे, नन्नू पटले, मनोहर पटले, लालचंद नेवारे, कोमल पटले, अनिता उके, उमेंद्र वालदे यांनी सहकार्य केले. यावेळी शेकडो महिला पुरूष उपस्थित होते. गेल्या आॅगस्ट महिन्याच्या ४ तारखेला सुरेंद्र उके व कल्पना कुंभरे या दोन्ही प्रेमी युगलाचा लग्न तंमुसने लावून दिले होते. सदर दोन्ही लग्न आंतरजातीय आहेत, हे विशेष.