तुळशी सहारेची चित्रकलेत भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:51 IST2017-10-22T23:50:58+5:302017-10-22T23:51:09+5:30

देसाईगंज तालुक्यातील मोहटोला येथील तुळशी नारायण सहारे या युवकाने चित्रकला स्पर्धेत राष्टÑीय, आंतरराष्टÑीयस्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.

Tulsi Saharichi painting fir | तुळशी सहारेची चित्रकलेत भरारी

तुळशी सहारेची चित्रकलेत भरारी

ठळक मुद्देआंतरराष्टÑीय स्पर्धेत सुयश : जिल्ह्यातील युवकांसाठी प्रेरणादायी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला/किन्हाळा : देसाईगंज तालुक्यातील मोहटोला येथील तुळशी नारायण सहारे या युवकाने चित्रकला स्पर्धेत राष्टÑीय, आंतरराष्टÑीयस्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्याचे हे यश जिल्ह्यातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळूनही त्याने अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचा रूळलेला मार्ग न निवडता स्वत:ची आवड लक्षात घेऊन चित्रकलेचे क्षेत्र निवडले. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयात चित्रकलेचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर याच क्षेत्रात करिअर करायचे असा, निर्धार करून त्याने मुंबई येथील एल.एस. रहेजा स्कूल आॅफ फाईन आॅर्ट याठिकाणी प्रवेश घेतला. शिक्षण घेतानाच राष्टÑीय, आंतरराष्टÑीय चित्रकला स्पर्धांमध्ये त्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले. तीनवेळा राष्टÑीय पुरस्कारासाठी, एकवेळा राज्य पुरस्कारासाठी व दोनदा इटली व चीन येथील आंतरराष्टÑीय पुरस्कारासाठी त्याची निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठाने त्याला ‘स्टुडंट आॅफ दी इयर’ पुरस्कारानेही गौरविले आहे. तुळशी सहारेचे हे यश जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.

Web Title: Tulsi Saharichi painting fir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.