शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग अधिकारी आणि कर्मचाऱ्यात हमरीतुमरी

By admin | Updated: December 11, 2014 23:08 IST

जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून पदभरती रेंगाळलेली आहे. सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर भत्त्यांपासून सहा-सहा महिन्यापासून वंचित ठेवत आहे.

गोंदिया : जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे गेल्या वर्षभरापासून पदभरती रेंगाळलेली आहे. सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर भत्त्यांपासून सहा-सहा महिन्यापासून वंचित ठेवत आहे. याबाबत एका कर्मचाऱ्याने त्यांना विचारपूस केली असता क्षयरोग अधिकाऱ्याने क्रोधात येवून सदर कर्मचाऱ्याला अपमानित केले. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात झालेल्या हमरीतुमरीनेमुळे सदर कर्मचाऱ्याचा रक्तदाब अत्यंत कमी झाला व त्यांना त्वरित केटीएस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.
हा प्रकार गुरूवारी ११ डिसेंबरच्या दुपारी २ वाजताच्या सुमारास जिल्हा क्षयरोग केंद्रात घडला. या घटनेबाबत क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना लिखीत तक्रार दिली आहे. रूग्णालयात दाखल करण्यात आलेला कर्मचारी वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर कार्यरत असून पवन वासनिक असे त्यांचे नाव आहे. वासनिक हे गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील क्षयरोग कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आहेत. त्यामुळे क्षयरोग कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य करतात.
घडलेल्या या प्रकारानंतर क्षयरोग केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांची तक्रार केली. त्यानुसार प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विनोद वाघमारे हे अधिनस्त कर्मचाऱ्यांना नेहमीच मानसिक त्रास देतात. त्यात प्रामुख्याने दर महिन्याला पगार न करणे, कर्मचाऱ्यांचे टीए व डीए वेळोवेळी न देणे, जीपीएफ व सोसायटीच्या कर्मचऱ्यांच्या कर्ज देयकावर स्वाक्षरी न करणे, कर्मचाऱ्यांची हेतूपुरस्पर अनुपस्थिती लावणे, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कर्मचारी दौऱ्यावर जाऊनसुद्धा हेतूपुरस्पर त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेणे, कर्मचाऱ्यांना शासकीय कामाकरिता लागणारे स्टेशनरी फाईल्स, झेरॉक्स इत्यादी न पुरविने, तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय कामासाठी लागणारे साहित्य टेबल, खुर्ची, कपाट इत्यादी वेळोवेळी निदर्शनास आणूणसुद्धा हेतूपुरस्पर विलंब करणे आदी बाबींचा समावेश आहे.
अशा त्रासात कर्मचारी काम करीत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे बरेवाईट झाल्यास त्यास प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वाघमारे हे स्वत: जबाबदार असतील, असे निवेदनात नमूद केले. या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांना बदलविण्याची मागणीसुद्धा केली आहे. तक्रारकर्त्यांमध्ये क्षयरोग केंद्रातील वरिष्ठ लिपीक पी.एस. नगरारे, कनिष्ठ लिपिक ए.टी. गजभिये, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ए.एम. लोणारे व आर.एम. रामटेके, शिपाही ए.डी. गुडपल्लीवार, पहारेकरी गिरीष तांबे, सफाईगार भरत मधूमटके, अधिपरिचारिका स्मृती वासनिक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक हरीष चिंधालोरे, वरिष्ठ उपचार प्रयोगशाळा पर्यवेक्षक पवन वासनिक, योगिता अडसड यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)