जिल्ह्यात तिघांच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:11 IST2017-05-15T00:11:33+5:302017-05-15T00:11:33+5:30

गोंदिया शहर व अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या सिरेगावबांध येथे घडलेल्या दोन घटनांत तिघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला.

Trying to kill three people in the district | जिल्ह्यात तिघांच्या खुनाचा प्रयत्न

जिल्ह्यात तिघांच्या खुनाचा प्रयत्न

गोंदिया व सिरेगावबांध येथील घटना : पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया शहर व अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या सिरेगावबांध येथे घडलेल्या दोन घटनांत तिघांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. यात शहरातील घटनेत तरूणाला शनिवारी (दि.१३) रात्री १०.३० वाजता मारहाण करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर सिरेगावबांध येथील घटनेत सायंकाळी ६.४५ वाजता एका जोडप्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, शहराच्या बाई गंगाबाई रूग्णालयाजवळ राहणाऱ्या रजत राज डहाट याला रेल्वे पोलिस ठाण्यांतर्गत खून केला होता अशी माहिती रेल्वे पोलिसांना का दिली म्हणून गढ्ढाटोली येथील कार्तिक गेंदलाल भालाधरे (२३) याने शनिवारी रात्री १०.३० वाजता आरोपी मोहम्मद बिरजा सिद्दीकी (२७,सिव्हील लाईन), आकाश राजकुमार रामटेके (१९,रा. गढ्ढाटोली) व इतर चार अशा सात जणांनी रॉड, चाकू व पाईपने प्राणघातक हल्ला चढविला. या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ३०७, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तर अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत सिरेगावबांध येथे आरोपी राहुल नाशिक चाचेरे याने माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने नेहमीच पाहतोस असे बोलून दिलीप सिताराम चिमणकर (४५) याना कुऱ्हाडीने मारले. त्यांच्या भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या सरगर दिलीप चिमणकर (४०,दोन्ही रा. सिरेगावबांध) यांनाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ४५२, सहकलम ३ (२)(५) अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.

Web Title: Trying to kill three people in the district