Trying to fulfill the expectations of the people, Purapur | जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुुरेपुर प्रयत्न करणार
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुुरेपुर प्रयत्न करणार

ठळक मुद्देसुनील मेंढे : भाजपतर्फे सत्कार व आभार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य करायचे आहे. अंत्योदयाच्या तत्वावर चालून अंतिम घटकापर्यंत विकासाला घेऊन जायचे आहे. ज्या विश्वासाने जनतेने निवडून दिले आहे, त्या विश्वासावर खरे उतरून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.
भारतीय जनता पक्ष गोंदिया ग्रामीण व शहर मंडळाच्या संयुक्तवतीने गुरूवारी (दि.१३) आयोजित आभार मेळाव्यात बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य विनोद अग्रवाल, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, जि.प. सभापती शैलजा सोनवाने, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, दिपक कदम, संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, धनंजय तुरकर, पन्नालाल मचाडे, परसराम हुमे, दिलीप गोपलानी, विनोद किराड प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी खासदार मेंढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना खा. मेंढे यांनी, कुठलीही समस्या असो संपर्क करावा. भंडारा येथे जनसंपर्क कार्यालय असून लवकरच गोंदिया येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करणार आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र मोठा असून प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेऊन हा विजय मिळविला आहे. तशीच मेहनत भविष्यातील विधानसभा निवडणुकीसाठी घ्यावी. सध्या जिल्हा परिषद आसोलीची निवडणूक सुरू असून कार्यकर्त्यांनी विजय संपादन करण्यासाठी पूर्ण ताकतीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
जिल्हाध्यक्ष पटले यांनी, मिळालेल्या यशावर हुरडुन न जाता आपले बुथ मजबुत करण्यासाठी सातत्याने कार्य करावे असे मत मांडले. याप्रसंगी विनोद अग्रवाल यांंनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रामीण मंडळ अध्यक्ष तुरकर यांनी मांडले. संचालन दिपक कदम यांनी. आभार मुकेश चन्ने यांनी मानले. कार्यक्रमाला नगर परिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य, सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.


Web Title: Trying to fulfill the expectations of the people, Purapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.