दाम्पत्याला ठार करण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: August 29, 2016 00:05 IST2016-08-29T00:05:29+5:302016-08-29T00:05:29+5:30

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागरा येथील राजेश दामोदर नागरिकर (४५) व उर्मिला राजेश नागरिकर (४०) या दाम्पत्याला

Try to kill the couple | दाम्पत्याला ठार करण्याचा प्रयत्न

दाम्पत्याला ठार करण्याचा प्रयत्न

निवडणुकीचा राग : चौघांवर गुन्हा दाखल
गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नागरा येथील राजेश दामोदर नागरिकर (४५) व उर्मिला राजेश नागरिकर (४०) या दाम्पत्याला गावातील चौघांनी निवडणुकीच्या कारणातून तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान घडली.
आरोपी प्रीतलाल उर्फ मुन्ना धर्माजी पतेहे (४१), मधुकर केरलाल कवरे (४१,रा. कटंगीकला), निलेश उसमन उके (२८,रा. गड्डाटोली, कटंगीकला) व मनिष रामपाल नागपुरे (३०,रा.अंगुरबगीचा,गोंदिया) या चौघांनी तलवार घेऊन नागरीकर यांच्या घरातील सामानाची तोडफोड करून राजेश नागरिकरला ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ग्रामपंचायतच्या जून्या निवडणुकीच्या कारणातून हे प्रकरण घडले. या घटनेसंदर्भात रामगनर पोलिसांनी भादंविच्या कलम ४५०, ४५२, ४२७, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Try to kill the couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.