ट्रक उलटला, तिघे जखमी

By Admin | Updated: June 20, 2016 01:30 IST2016-06-20T01:30:00+5:302016-06-20T01:30:00+5:30

सालेकसा- आमगाव राज्य महामार्ग क्रमांक २४९ वरील पानगाव नहराजवळ शनिवारी (दि.१८) सकाळी धानाची पोती घेऊन जात असलेला दहा चाकी ट्रक उलटला.

Truck reversed, three injured | ट्रक उलटला, तिघे जखमी

ट्रक उलटला, तिघे जखमी

आमगाव मार्गावरील घटना : वाहतूक ठप्प
सालेकसा : सालेकसा- आमगाव राज्य महामार्ग क्रमांक २४९ वरील पानगाव नहराजवळ शनिवारी (दि.१८) सकाळी धानाची पोती घेऊन जात असलेला दहा चाकी ट्रक उलटला. यामध्ये तीघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे भर रस्त्यावरच ट्रक उलटल्याने या मार्गावरील वाहतूक सात तास ठप्प होती.
लगतच्या मध्य् ाप्रदेश राज्यातील सिवनी येथून सोसायटीची धानाची पोती भरून ट्रक क्रमांक सीजी ०४/जेसी ११९६ छत्तीसगडकडे जात होता. मात्र सकाळी ८ वाजतादरम्यान सालेकसा-आमगाव राज्य महामार्गावरील पानगाव नहराजवळ वळणावर ट्रक भर रस्त्यावर उलटला. यात ट्रकचालक बचावला असून वाहक अनिल कुमार (४०, रा. गोंदिया) यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला गोंदियाला रेफर करण्यात आले. सचिन भिमटे (रा.आमगाव) हा जखमी झाल्याने त्याला ग्रामीण रूग्णालयात भर्ती करण्यात आले. तर हमाल किरकोळ जखमी झाला आहे.
ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटल्यामुळे मात्र या मार्गावरील वाहतूक सात ठप्प होती. यामुळे सायंकाळी ४ वाजतादरम्यान ट्रक मधील धानाची पोती काढण्यात आली. तसेच जेसीबीच्या मदतीने ट्रकला रस्त्याच्या कडेला करण्यात आले असता सायंकाळी वाहतूक सुरू झाली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Truck reversed, three injured