ट्रकच्या धडकेत तरूण ठार

By Admin | Updated: June 19, 2017 01:21 IST2017-06-19T01:21:55+5:302017-06-19T01:21:55+5:30

भरघाव वेगात असलेल्या ट्रकच्या धडकेत ३२ वर्षीय तरूण ठार झाला. घुसोबाटोला येथे शनिवारी

The truck killed a young man | ट्रकच्या धडकेत तरूण ठार

ट्रकच्या धडकेत तरूण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : भरघाव वेगात असलेल्या ट्रकच्या धडकेत ३२ वर्षीय तरूण ठार झाला. घुसोबाटोला येथे शनिवारी (दि.१७) रात्री ८.३० वाजतादरम्यान ही घटना घडली असून मृताचे नाव कैलाश गेंदू भेंडारकर (रा.घुसोबाटोला) असे आहे.
शनिवारी रात्री घरच्यांसोबत जेवण करून कैलाश शेतात गायी-म्हशींना चारा टाकायला गेला होता. तेथून पायी परत येत असताना अर्जुनी-मोरगाव ते सानगडी रस्त्यावर घराजवळून काहीच अंतरावर अज्ञात ट्रकने त्याला धडक देऊन फरफटत नेले. अंधार असल्याने गावकऱ्यांच्या काहीच लक्षात आले नाही. मात्र काही वेळाने रक्ताच्या थारोळ््यात कैलाश दिसला असता त्याला सानगडी येथे दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या मागे आई,वडील,पत्नी, लहान भाऊ व तीन वर्षांची मुलगी आहे. घुसोबाटोला येथील घाटावर रविवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The truck killed a young man