३३ जनावरांनी भरलेला ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:00+5:302021-02-05T07:48:00+5:30
ट्रक (सीजी १५-ए ७४१७)मध्ये ३३ जनावरे डांबून त्यांची वाहतूक करीत असताना देवरीचे सहायक पोलीस निरीक्षक अजित कदम, पोउपनि ...

३३ जनावरांनी भरलेला ट्रक पकडला
ट्रक (सीजी १५-ए ७४१७)मध्ये ३३ जनावरे डांबून त्यांची वाहतूक करीत असताना देवरीचे सहायक पोलीस निरीक्षक अजित कदम, पोउपनि उरकुडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पाठलाग करून लोहारा येथे ट्रकला ताब्यात घेतले. मोहम्मद नसीम मोहम्मद यासीम अंसारी (३०, रा. हमीद नगर, नागपूर) असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. या ट्रकमधील ३३ जनावरांची किंमत एक लाख ६५ हजार रुपये व १० लाख किमतीचा ट्रक असा एकूण ११ लाख ६५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. देवरी पोलिसांनी आरोपीवरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम ११ (१),(ड), सहकलम,५ (अ),९ म. रा. प्राणी संरक्षण कायदा सन-१९९५, सहकलम १८४, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.