ठाणा-गोरेगाव मार्गावर जनावरांचा ट्रक पकडला
By Admin | Updated: August 25, 2016 00:05 IST2016-08-25T00:05:11+5:302016-08-25T00:05:11+5:30
ठाणा-गोरेगाव मार्गावर दि. २४, मंगळवारी रात्री १ वाजता जवळपास २७ गुरे भरलेला ट्रक पकडण्यात आला.

ठाणा-गोरेगाव मार्गावर जनावरांचा ट्रक पकडला
२७ गुरांची सुटका : नवीन ठाणेदाराचा दणका
आमगाव : ठाणा-गोरेगाव मार्गावर दि. २४, मंगळवारी रात्री १ वाजता जवळपास २७ गुरे भरलेला ट्रक पकडण्यात आला. या कारवाईमुळे अवैधपणे गुरांची वाहतूक करण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणा-गोरेगाव मार्गाने जनावरांचा ट्रक जात असल्याची गुप्त माहिती नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा टाकून रात्री १ वाजता जवळपास २७ लाल, पांढऱ्या रंगाचे गुरे पकडण्यात आली. जवळपास त्याची किमत पाच लाखाच्या घरात आहे.
ट्रक क्रमांक एमएच ३५ के ५५८३ असून चालक अरुण नोहरलाल दमाहे मु. मोहनटोला याला अटक करण्यात आली. सदर गुरे कुठे जात होती याचा तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे नगरातील काही व्यक्ती अवैध गुरांचा व्यवसाय करतात त्यांना चांगलाच दणका बसला आहे. (तालुका प्रतिनिधी)