कत्तलखान्यात जाणाऱ्या ३० जनावरांच्या ट्रकला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:03+5:302021-02-05T07:48:03+5:30
गोंदिया : जनावरांना अत्यंत निर्दयीपणे बांधून कत्तलीसाठी नेत असलेल्या ट्रकला नवेगावबांध पोलिसांनी धाबेपवनी येथील चौकात ३० जानेवारी रोजी सकाळी ...

कत्तलखान्यात जाणाऱ्या ३० जनावरांच्या ट्रकला पकडले
गोंदिया : जनावरांना अत्यंत निर्दयीपणे बांधून कत्तलीसाठी नेत असलेल्या ट्रकला नवेगावबांध पोलिसांनी धाबेपवनी येथील चौकात ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान पकडले.
ट्रक सीजी १०-सी ८२२४ मध्ये ३० जनावरांचे पाय बांधून तसेच जनावरांचे तोंड दोरीने कसून बांधून त्यांना कोंबून नेत असताना पोलिसांनी पकडले. या जनावरांची किंमत तीन लाख रुपये तर ट्रकची किंमत १० लाख रुपये असून असा १३ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस हवालदार कोडापे यांनी केली आहे. या प्रकरणात चार आरोपींवर नवेगावबांध पोलिसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा कायदा कलम ११ (१) (ड) (ई) सहकलम ५ (अ), (ब), ९ महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम २०१५, सहकलम १०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक हेगडकर करीत आहेत.