काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेसचा विलय
By Admin | Updated: June 7, 2015 01:46 IST2015-06-07T01:46:15+5:302015-06-07T01:46:15+5:30
तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभिये यांनी आपल्या संपूर्ण कार्यकारिणी व शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेसचा विलय
गोंदिया : तृणमूल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभिये यांनी आपल्या संपूर्ण कार्यकारिणी व शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संपूर्ण जिल्हा तृणमूल काँग्रेसचा विलय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये करण्यात आला.
याप्रसंगी प्रमोद गजभिये यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरूण भांडारकर, जिल्हा प्रचारक नेमीचंद डोये, जिल्हा महासचिव नेताजी रहांगडाले, डॉ. सदाशिव शेंडे, पोवार सेलचे जिल्हाध्यक्ष ठेकणलाल रहांगडाले, जिल्हा महिला अध्यक्ष रिना दामोदर भेंडारकर, जिल्हा महिला अपंग युनियनचे अध्यक्ष अर्चना महादेव दुनेदार, जिल्हा संघटक देवा राऊत, सडक-अर्जुनीचे तालुकाध्यक्ष नेवलराम उईके, तालुका महासचिव हिवराज सय्याम, तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर मोंडे, तालुुका संघटन गोपाल वैद्य, गोरेगाव तालुकाध्यक्ष झामा चौरीवार, उपाध्यक्ष प्रमोद तिराले, धनिराम मडावी, अर्जुनी-मोरगाव तालुकाध्यक्ष सुलोचना शेंडे, उपाध्यक्ष जगदीश सांगोळे, सचिव अश्वघोष शेंडे, मनोहर राऊत, गोंदिया शहर अध्यक्ष छोटू भालाधरे, उपाध्यक्ष पिंटू ठाकूर, आदिवासी जिल्हाध्यक्ष मिताराम भोयर, जिल्हा संघटक अशोक तिलगाम, राजू मेश्राम, नितेश गुरूनुले, रिझवाना शेख, सालेकसा तालुका अध्यक्ष जागेश्वर नागपुरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी आ. माणिकराव ठाकरे, आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनी पुष्पगुच्छ देवून सर्वांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)