समाजहितासाठी झटणाऱ्यांचा हा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST2021-08-24T04:33:08+5:302021-08-24T04:33:08+5:30

गोरेगाव : पोलीस प्रशासनातील अधिकारी, कम॔चारी दिवसरात्र मेहनत घेतात. नागरिकांच्या हितासाठी, सुरक्षेसाठी राबराब राबतात. कोणतेही मोठे सण असो; पण ...

This is a tribute to those who strive for social welfare | समाजहितासाठी झटणाऱ्यांचा हा सत्कार

समाजहितासाठी झटणाऱ्यांचा हा सत्कार

गोरेगाव : पोलीस प्रशासनातील अधिकारी, कम॔चारी दिवसरात्र मेहनत घेतात. नागरिकांच्या हितासाठी, सुरक्षेसाठी राबराब राबतात. कोणतेही मोठे सण असो; पण पोलीस विभाग नेहमी कर्तव्यावरच पाहायला मिळतो. त्या खाकीलाही स्वत:चे कुटुंब असते. मात्र, स्वहित न पाहता समाजासाठी झटणाऱ्या पोलीस विभागाची आम्ही दखल घेतली, असे प्रतिपादन माजी खा. डाॅ. खुशाल बोपचे यांनी केले.

शहरातील पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२३) आयोजित रक्षाबंधन आणि कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे यांच्यासह पोलीस कम॔चारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याशिवाय ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक डाॅ. रुस्तम येडे, सरपंच सोमेश रहांगडाले, रामू हरिणखेडे, शहर अध्यक्ष कृष्णकुमार बिसेन, कार्याध्यक्ष कमलेश बारेवार, युवा अध्यक्ष नितेश येल्ले, महिला शहर अध्यक्ष उषा रामटेके, अनिता तुरकर, कल्पना शेवते, रंजना बारेवार, रामू अगडे, अर्चना चौधरी, रंजू अगडे, सुषमा अगडे, पंचफुला मडावी, कविता चाकाटे, वैशाली येल्ले, व्दारका भोयर, कुंदा रुखमोडे, शुभम रामटेके उपस्थित होते.

Web Title: This is a tribute to those who strive for social welfare