शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली
By Admin | Updated: January 12, 2017 00:19 IST2017-01-12T00:19:18+5:302017-01-12T00:19:18+5:30
तिरोडा तालुक्यातील इंदोरा बुजरुक येथील आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने शहीद ११४ आदिवासी गोवारी बांधवाचा

शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली
इंदोरा/बु.: तिरोडा तालुक्यातील इंदोरा बुजरुक येथील आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने शहीद ११४ आदिवासी गोवारी बांधवाचा २२ वा श्रध्दांजली सोहळा पंचायत समिती सदस्य नत्थू अंबुले यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी गोवारी समाज भवनात आयोजित करून श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य प्रशासक बसंत भगत, पं.स.सदस्य पवन पटले, आदिवासी गोवारी समाज संघटना तालुकाध्यक्ष बळीराम राऊत, सरपंच राजेश रहांगडाले, अध्यक्ष हेमराज अंबुले, माजी उपसरपंच मुरलीदास गोंडाणे, डॉ. धनंजय राऊत, डॉ. भुमेश्वर सोनेवाने, निलकंठ शहारे, विश्वजीत अंबुले, रामजी अंबुले, रामेश्वरी सोनेवाने, सुनिता ठाकरे, वनमाला आंबेडारे उपस्थित होते. यावेळी गोवारी समाजावर होणारे अन्याय व गोंड-गोवारी यांच्या जीआर संबधी उपस्थित बांधवाना संबोधीत केले.
गोवारी समाजांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत सर्वांंनी संघटीत होऊन लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला तालुक्यातील गोवारी समाजाचे कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक पी.एल.भगत यांचा सेवानिवृत्तीवर त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. आदेश राऊत यांनी तर आभार खिलास कृपाले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इसन आंबेडारे, करोडपती राऊत, पन्नालाल कवरे, दिलीप आंबेडारे, हौशीलाल शहारे, रामचंद्र चौधरी, वसंत चौधरी, गणेश आंबेडारे, मारोती आंबेडारे, सुखदास राऊत, बसंत कोहळे, रविंद्र शहारे यांनी सहकार्य केले. अरूणा वासनिक, मुख्याध्यापक पी.एल.भगत, रमेश कुपाले, बुध्दल राऊत, राजू आंबेडारे, राधेश्याम नेवारे, तोरण सोनेवाने, पोलीस पाटील हितेश सोनवाने, उपसरपंच मदन पटले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रुपकुमार अंबुले, आदिवासी गोवारी समाज बांधव व ग्रामस्थ मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम आदिवासी गोवारी शहिद गोवारी स्मारकामध्ये दिप प्रज्वलीत करून शहिदांना पुष्पअर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे मंचावर आगमन होताच स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक गोवारी स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. धनराज राऊत यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकेत गोवारी समाजाच्या समस्या यावर मार्गदर्शन केले. गोवारी समाजाचे अधिकार समाजाला केव्हा मिळतील यावर चर्चा घडवून आणली. उपस्थित मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष बलीराम राऊत यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)