आदिवासींचा ८ ला हक्कसंघर्ष मोर्चा
By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:58+5:302015-12-05T09:07:58+5:30
मुलनिवासी आदिवासी हक्क संघर्ष महासंघ, नागपूरच्या वतीने ८ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर खऱ्या आदिवासींचा हक्क संघर्ष महामोर्चाचे आयोजन...

आदिवासींचा ८ ला हक्कसंघर्ष मोर्चा
सोनपुरी : मुलनिवासी आदिवासी हक्क संघर्ष महासंघ, नागपूरच्या वतीने ८ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर खऱ्या आदिवासींचा हक्क संघर्ष महामोर्चाचे आयोजन दुपारी १ वाजता मॉरेस कॉलेज ग्राऊंड, यशवंत स्टेडियम धंतोली, नागपूर येथून निघणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आदिवासींचा मोर्चा महाराष्ट्र एक्स्प्रेसने ८.३० वाजता गोंदियावरुन निघणार आहे. या महामोर्चाचे नेतृत्व राजे वासुदेवशहा टेकाम, आमदार राजू तोडसाम, संजय पुराम, वसंत पुरके व सर्व आदिवासी आमदार करणार आहेत.
मोर्चात आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे दुर्गाप्रसाद कोकोडे, राधेश्याम टेकाम, परमेश्वर उईके, अनील वट्टी, पी.बी. टेकाम, प्रदीप उईके, बाबा उईके, गुलाब धुर्वे, राजेश भोयर, अरविंद सोपान, मेघराज घरत, रमन खरत, संतोष पंधरे, रमण टेकाम, विजय टेकाम, हिरालाल फाफनवाडे, सीमा मडावी, संतोष पेंदारे, विलास कसुते, दिनेश परसगाये आदींनी केले आहे.