वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज (वन दिन)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST2021-03-24T04:27:07+5:302021-03-24T04:27:07+5:30
आमगाव : वृक्षांचे कमी होणारे प्रमाण हा आज जागतिक चिंतनाचा विषय आहे. वृक्षलागवड करणे सोपे आहे. मात्र, वृक्ष जोपासना ...

वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज (वन दिन)
आमगाव : वृक्षांचे कमी होणारे प्रमाण हा आज जागतिक चिंतनाचा विषय आहे. वृक्षलागवड करणे सोपे आहे. मात्र, वृक्ष जोपासना करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन क्षेत्र सहायक आर.जे. दसरिया यांनी केले.
तालुक्यातील ग्राम कुंभारटोली येथील महादेव पहाडी येथे आयोजित जागतिक वन दिवस कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राउंड बिटरक्षक ए.पी. ढगे, वनरक्षक पी.जे. बनसोड, एल.पी. बिसेन, यू.के. बिसेन, जी.आय. लांजेवार, के.यू. कदम, के.एस. बिसेन, एन.बी. बागडे, जी.के. डोये, एस.पी. बागडे, ग्राम वन समितीचे अध्यक्ष इनोर खोब्रागडे, उपाध्यक्ष कविता डोंगरे, सहसचिव प्रकाश बोंम्बार्डे, विजय डोंगरे, राधाकिसन चुटे, संतोष वालदे, मुकेश डोंगरे, रंजीत गेडाम, भरत उईके, सुष्मिता येटरे, ममता मेश्राम, आशिष वैद्य आदी उपस्थित होते.