१५ दिवसांत आठ जणांचा ट्रॅप

By Admin | Updated: November 6, 2015 02:47 IST2015-11-06T02:47:34+5:302015-11-06T02:47:34+5:30

दिवाळीला अद्याप पाच दिवसांचा कालावधी उरलेला असला तरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मात्र आॅक्टोबर

Trap of eight people in 15 days | १५ दिवसांत आठ जणांचा ट्रॅप

१५ दिवसांत आठ जणांचा ट्रॅप

 कपिल केकत ल्ल गोंदिया
दिवाळीला अद्याप पाच दिवसांचा कालावधी उरलेला असला तरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मात्र आॅक्टोबर महिन्यापासूनच दिवाळी साजरी करीत असल्याचे दिसून येत आहे. या विभागाने १५ दिवसांच्या कालावधीत चक्क सात कारवाया केल्या असून विभागाच्या इतिहासात यापूर्वी इतक्या कमी दिवसात एवढ्या कारवाया होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे या कारवायांत भंडारा पथकाच्या दोन कारवायांचा आहे. या सात कारवायांत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक लाचखोरी पोलीस खात्यातच सुरू असल्याचे दिसून येते.
लाचखोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी गोंदियात सन २०१० पासून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. सुरूवातीचा सन २०१३ पर्यंतचा काळ विभागासाठी तेवढा अनुकूल ठरला नाही. मात्र सन २०१४ पासून विभागाचे यशाची पायरी चढण्यास सुरूवात केली. पोलीस उप अधिक्षक दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात विभाग दिवसेंदिवस कारवाया करीत असून त्यांचा आकडा चढता दिसून येत आहे.
यातही सन २०१५ लाचलुचपत प्रतिबंधक विभागासाठी भरभराटीचे लाभले आहे. कारण अद्यापपर्यंत विभागाने ३५ कारवाया करून आतापर्यंत सर्वाधीक कारवायांचा इतिहास घडविला आहे. विशेष म्हणजे आॅक्टोबर महिन्याचा २१ तारखेपासून विभाग आल्या दिवशी कारवाया करीत असल्याचे बघावयास मिळत आहे. तर ४ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच या १५ दिवसांच्या काळात विभागाने सात कारवाया केल्या आहेत. यात दोन कारवाया भंडारा येथील पथकाने केल्या असल्या तरिही गोंदियाच्या पथकाने पाच कारवायांत सहा जणांना ट्रॅप केले.

पोलिसांनीच काळीमा फासला
४लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस विभागाचीच एक शाखा असून पोलीस विभागातील कर्मचारीच या शाखेत कार्यरत असतात. अशात मात्र पोलीस विभागाताच सर्वाधीक लाचखोर असल्याचे प्रकार येथील कारवायांत दिसून येत आहे. कारण २३ आॅक्टोबर व २ नोव्हेंबर या दोन दिवसांत विभागाने केलेल्या तीन कारवायांत विभागाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह एका होमगार्डला अटक केली आहे.
पुरवठा निरीक्षकाच्या अटकेने अनेकांचे धाबे दणाणले
४पथकाने आमगाव येथील पुरवठा निरीक्षक महेंद्र गांगुर्डे यास २७ आॅक्टोबर रोजी कारवाई करून अटक केली. विशेष म्हणजे त्यांच्या अटकेने अनेकांचे धाबे दणाणल्याची माहिती आहे. तर त्यानंतर आता आणखीही काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आणखी एका कनिष्ठ लिपिकाला अटक
४तडीपार प्रकरणातील अहवाल पाठविण्यासाठी ५ हजारांची रक्कम मागणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडण्यात आले. जनार्धन मुगाजी काळे (३०) असे त्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. गोंदियाच्या उपविभागीय कार्यालयात तो कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनात दिनकर ठोसरे, प्रमोद घोंगे, प्रमोद चौधरी, दिलीप वाढनकर, दिवाकर भदाडे, दीपक दत्ता, योगेश शेंद्रे, अरविंद जाधव, योगेश उईके, दिगंबर जाधव, शेखर खोब्रागडे, देवानंद मारबदे, वंदना बिसेन यांनी केली आहे.

Web Title: Trap of eight people in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.