ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर गोळी झाडून खून ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:31 IST2021-08-22T04:31:48+5:302021-08-22T04:31:48+5:30

गोंदिया : शहराच्या गणेशनगरातील अशोक बाबूलाल कौशिक (४५) यांच्यावर २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गोळी झाडून अज्ञात आरोपीने ...

Transport businessman shot dead () | ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर गोळी झाडून खून ()

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर गोळी झाडून खून ()

गोंदिया : शहराच्या गणेशनगरातील अशोक बाबूलाल कौशिक (४५) यांच्यावर २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गोळी झाडून अज्ञात आरोपीने त्यांचा खून केला. त्यांच्या डोक्यावर गोळी झाडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एनसीसी ट्रान्सपोर्टचे ते मालक आहेत. ते सकाळी ७ वाजता मॉर्निंग वाॅक करण्यासाठी घरून बाोर पडले होते. गोंदियाच्या सर्कस मैदानावर ते मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांच्यावर बंदुकीची गोळी झाडण्यात आली. डोक्यावर गोळी झाडल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. आरोपीने वार केल्यानंतर बंदूक जवळच्या झाडेझुडपात फेकून पसार झाला. घटनास्थळावर पडलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. खून करण्यामागील नेमके कारण काय होते, हे अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणाचा तपास गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे तपास करीत आहेत.

Web Title: Transport businessman shot dead ()