लोकमत न्यूज नेटवर्कराजोली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ ग्रामसंघाला चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. शनिवारी (दि.२३) अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, प्रकल्प संचालक डॉ. मुंडे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे, मंदा कुंभरे, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, बालविकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे, जिल्हा अभियंता व्यवस्थापक अनिल गुंजे, जिल्हा व्यवस्थापक नाशिर शेख, प्रविण भांडारकर, तालुका अभियान व्यवस्थापक रेशिम नेवारे, तालुका व्यवस्थापक कोविंदकुमार रंगारी, प्रभाग समन्वयक सुरेंद्र भावे, श्वेता रंगारी, अमित सिंगरौर, प्रभाग व्यवस्थापक डोंगरवार, आष्टेकर, भोवे, गोपाल मेश्राम आदी उपस्थित होते.ग्रामीण भागात उत्पादित होणारा माल सरळ बाजारपेठेत पोहोचता करुन महिलांचा आर्थिक स्त्रोत वाढविणे व महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे या उदात्त हेतूने तालुक्यातील एकता ग्राम संघ गौरनगर, भरारी ग्रामसंघ महागाव, राणी ग्रामसंघ बोरटोला, साक्षी ग्रामसंघ येगाव, एकता ग्रामसंघ धाबेटेकडी, सावित्रीबाई फुले ग्रामसंघ भिवखीडकी या सहा ग्रामसंघांना चारचाकी वाहने हस्तांतरित करण्यात आली.चारचाकी वाहन उपलब्ध करुन दिल्यामुळे ग्रामसंघांनी लघु उद्योगाच्या माध्यमातून उत्पादित केलेला माल भाजीपाला, गौणउपज, कडधान्य मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होईल. ग्रामसंघाच्या माध्यमातून गावात उत्पादित होणाऱ्या मालाचे संग्रहन करुन तो बाजार पेठेत वाढविण्याचा मार्ग सुकर होणार आहे. चारचाकी गाडीच्या सहाय्याने लहान व्यवसाय सुरु करुन एका गावातील २०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी यावेळी सांगितले. संचालन अभियान व्यवस्थापक (आजीविका) प्रविण भांडारकर यानी केले. आभार रेशिम नेवारे यांनी मानले.महिला विकासासाठी शासन कटिबद्ध - बडोलेअभियानाच्या माध्यमातून महिलांचे गट तयार करणे व ग्रामसंघाची स्थापना करुन त्यांना वित्तीय सहायता (उद्योगासाठी) यासाठी योग्य समन्वयाची गरज आहे. बचतगटांचे सक्षमीकरण करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तालुक्यात ३०० महिलांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून स्थापन केलेल्या गिरीजा महिला शेतकरी उत्पादक संघाला व्यावसायाकरिता आवश्यक ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:17 IST
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६ ग्रामसंघाला चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. शनिवारी (दि.२३) अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
चारचाकी मालवाहक गाड्यांचे हस्तांतरण
ठळक मुद्देग्रामीण जीवनोन्नती अभियान : सहा संघांना मिळाल्या गाड्या