रोजगार प्राप्तीसाठी प्रशिक्षण आवश्यक
By Admin | Updated: July 18, 2015 01:18 IST2015-07-18T01:18:37+5:302015-07-18T01:18:37+5:30
वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्यक अहे.

रोजगार प्राप्तीसाठी प्रशिक्षण आवश्यक
विजय सूर्यवंशी : कौशल्य विकास कार्यकारी समितीची सभा
गोंदिया : वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्यक अहे. युवक-युवती यामधून स्वावलंबी होण्यासोबत रोजगार प्राप्त करण्यासाठी सक्षम होतील, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १५ जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर उपस्थित होते.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. औद्योगिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असताना सुद्धा औद्योगिक क्षेत्राला सुद्धा कुशल मनुष्यबळाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना सुद्धा औद्योगिक क्षेत्राला सुद्धा कुशल मनुष्यबळाची कमतरता भासते. औद्योगिक क्षेत्रात ज्या कामासाठी कौशल्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या कौशल्यप्राप्त कामगार निर्मितीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना योग्य ते शिक्षण देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींनी स्थानिक पातळीवर रोजगार प्राप्त करण्यासाठी त्यांना बांबूवर आधारित साहित्य व वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.
सभेमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम २०१४- १५ या वर्षात ४५० मुलामुलींना आदरातिथ्य, बांधकाम, आॅटोमोबाईल्स या क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली. ५० युवक-युवतींची तुकडी बांधकाम व आदरातिथ्य या प्रशिक्षणासाठी लातूर व औरंगाबाद येथे पाठविण्यात आल्याची माहिती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक भोयर यांनी प्रास्ताविकेतून दिली.
जागतिक युवा कौशल्य दिनाचा औचित्य साधून जिल्ह्यातील अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे सहायक महाव्यवस्थापक डॉ. विजय गंधेवार, वसंत फाईन आर्ट लिथोवर्कचे संचालक सुनील धोटे, एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष हुकुमचंद अग्रवाल, एमआयडीसीमधील सोना उद्योग लि.चे. वधवा, लाख इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष गजानन अग्रवाल, माहेश्वरी साल्व्हेंट उद्योग व्यवस्थापक आनंद तिवारी या उद्योजकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या गोंदिया येथील गणेश शिक्षण संस्थेचे संचालक गजानन उमरे, गोरेगाव येथील पार्वती बहुउद्देशिय संस्थेचे संचालक लिलेश्वर रहांगडाले, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यक्रम समन्वयक विशाल मेश्राम आणि तिरोडा येथील आनंद मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक आनंद गहरवार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)