डोंगरुटोला येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:18:42+5:302014-09-27T23:18:42+5:30
तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी गोरेगावतर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना एक दिवसाचे भात प्रकल्पाचे प्रशिक्षण डोंगरुटोला येथे देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

डोंगरुटोला येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण
सडक/अर्जुनी : तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी गोरेगावतर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना एक दिवसाचे भात प्रकल्पाचे प्रशिक्षण डोंगरुटोला येथे देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवचंद ठाकरे, उद्घाटक म्हणून किशोर भगत अतिथी म्हणून मंडळ कृषी अधिकारी पी.एस. मेंढे, कृषी पर्यवेक्षक एफ.आर. शहा, शिरसाटे उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या असंख्य वाणांचा वापर सुरु केला आहे. फक्त रासायनिक खताचा वापर अधिक होत असल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेत जमिनीची माती परिक्षण करुनच शिफारशी नुसारच खतांचा समातोल वापर करावा असे आवाहन गोरेगावचे कृषी पर्यवेक्षक एफ.आर.टी. शहा यांनी केले. धान रोपवरील खोडकिडा करपा, कडा करपाचे नियंत्रणासाठी क्लोरो पायरीफॉस २० टक्के प्रवाही १५ ते २० मिली अधिक २२ टन १० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लीटर पाण्यात घेवून फवारणी करावी. तसेच नत्र खताचा पुरक हप्ता २५ किलो प्रती हेक्टर द्यावे. शेतकऱ्यांनी पिकेल ते विकव्या पेक्षा, विकेल तेच पिकवावे असे उद्गार एफ.आर.टी. शहा व्यक्त केले.
मंडळ कृषी अधिकारी पी.एस. मेंढे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक क्षीरसाटे यांनी दशपर्णी अकोबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन कृषी सहायक घरत यांनी तर आभार वंजारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी कृषी सहायक घरत, सोरदे, हरणिखेडे, प्रतीभा राऊत, गहाणे, काकडे, नागपुरे, कोहाड, मल्लेवार, मेश्राम, रंगारी, कृषी मीत्र मुलचंद, कटरे, पाणलोट, सचिव सुरेंद्र पटले यांनी सहकार्य केले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत एकुण २५० शेतकऱ्यांना ०.४० हे क्षेत्राकरीता प्रात्याक्षिक घेवून बियाणे, खते व निविष्ठा देण्यात आल्या. यावेळी ६० शेतकऱ्यांना कोनोवीडर (उवरा) वाटप करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)