जिल्हा ट्रामा टीमचे प्रशिक्षण उत्साहात

By Admin | Updated: December 31, 2016 01:42 IST2016-12-31T01:42:03+5:302016-12-31T01:42:03+5:30

बालकांवरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला व बलात्कारपिडीत महिलांना तातडीने आधार देण्यासाठी व या

The training of the district trauma team | जिल्हा ट्रामा टीमचे प्रशिक्षण उत्साहात

जिल्हा ट्रामा टीमचे प्रशिक्षण उत्साहात

गोंदिया : बालकांवरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला व बलात्कारपिडीत महिलांना तातडीने आधार देण्यासाठी व या मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या मनोधैर्य योजनेच्या जिल्हा ट्रामा टीमचे प्रशिक्षण २८ डिसेंबर रोजी कटंगीकला येथील लॉनमध्ये उत्साहात संपन्न झाले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन न्या.ए.एच. लध्दड यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, तज्ञ मार्गदर्शक म्हणून सविता बेदरकर, अनिल रेवतकर, वैशाली केळकर, प्रा. संगीता घोष यांची उपसिञथती होती.
श्रीमती वेदरकर यांनी मनोधैर्य योजना संबंधित यंत्रणेच्या प्राथमिक स्तरावर आवश्यकता व महत्व प्रा.घोष यांनी मनोधैर्य योजनेत प्रत्यक्ष काम करताना प्रकरण संवेदनशीलतपणे हाताळण्यात यावे याकरिता प्रत्येक व्यक्तीने सामाजिक बांधिलकी जपून करणे याविषयी रेवतकर यांनी या योजनेची पार्श्वभुमी, अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणेचा सहभाग, श्रीमती केळकर यांनी कायदेविषयक सहाय्य व एफ.आय.आर. लिहिताना घ्यवयाची काळजी, रजनी रामटेके यांनी ट्रामा टिम तयार करणमागचा उद्देश, हेतू, कर्तव्यदक्ष व जबाबदाऱ्या, सुहास बोंदरे यांनी लैगीग शोषणापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ मधील तरतूदी व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ञ, अधिपरिचारिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नम्रता चौधरी यांनी केले. संचालन परीरिक्षा अधिकारी के.बी. रामटेके यांनी केले. उपस्थितांचे आभार परिविक्षा अधिकारी राजू बोदले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The training of the district trauma team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.