शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

निवडणुकीच्या चोख बंदोबस्तासाठी ७२४ पोलिसांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 6:00 AM

विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी-कर्मचारी, गृहरक्षक दल यांच्याकरिता निवडणूक व्यवस्थापन व बंदोबस्त प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देतज्ज्ञांचे मार्गदर्शन : ईलेक्शन ई-लर्निंग मॉडयुल एमपीए-२०१९ प्रशिक्षणाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील १०० टक्के प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत ई-लर्निंग मॉडयुल-२०१९ चे उपक्रम सुरू राहणार आहे. सदर प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षक तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातील ३५ अधिकारी व ९० पोलीस कर्मचारी आणि ५९९ गृहरक्षक दलाला हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणुकीच्या दरम्यान चोख बंदोबस्त ठेऊन कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी-कर्मचारी, गृहरक्षक दल यांच्याकरिता निवडणूक व्यवस्थापन व बंदोबस्त प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ मुक्त आणि नि:पक्षपातीपणे वातावरणात व्हाव्यात,ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका आहेत, अशा ठिकाणी मनुष्यबळ तैनाती हा निवडणुकीचा महत्त्वाचा भाग असल्याने त्या अनुषंगाने निवडणूक आदर्श आचारसंहितेत कसे पालन व्हावे. आचार संहिता भंग करणाऱ्यांवर काय कारवाई करावी यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. निवडणुकीचा अनुषंगाने निवडणूक विषयी कायदे लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, भारतीय दंड विधान १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, महाराष्ट्रपोलीस अधिनियम १९५१, महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५, वेब कॉसटिंग, कॅमेरा व व्हिडीओ ग्राफी, एस.एम.एस. आदी तंत्रज्ञानाचा वापर, निवडणुकीसंबंधी परिपत्रके आणि मागील निवडणुकीचा केस स्टडीज या विषयावर महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकेडमी, नाशिक येथील ईलेक्शन ई-लर्निंग मॉडयुल व तज्ञ व्यक्तिचे मार्गदर्शन व व्हिडीओ दाखविण्यात आले.प्रशिक्षणात पोलीस उपअधीक्षक (मुख्य) सोनाली कदम, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक महिपालसिंग चांदा, पोलीस निरीक्षक राहुल शिरे, रंगनाथ धारबळे, रविंद्र करपटे यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणात उपस्थित असलेले पोलीस अधिकारी हे आप-आपले पोलीस स्टेशन, सी-६० मधील अधिनिस्त पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना नाशिक पोलीस अ‍ॅकेडमी येथील ईलेक्शन ई-लर्निंग मॉडयुल-२०१९ चे प्रशिक्षण देणार आहेत.आदर्श आचारसंहितेचे होणार पालनआदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलिसांनी भूमिका, निवडणूक बंदोबस्त यामध्ये निवडणुकीचा पूर्वकाळ मतदान दिवस बंदोबस्त, निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी ठिकाणाचा बंदोबस्त, भरारी पथक, स्टॅटिक सर्वेलंस टिम यांची भूमिका, पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक काळात घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019