वर्षभरात ७२०० महिलांना प्रशिक्षण
By Admin | Updated: April 19, 2017 00:10 IST2017-04-19T00:10:13+5:302017-04-19T00:10:13+5:30
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हस्तशिल्प विकास आयुक्तांच्या आदेशान्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर

वर्षभरात ७२०० महिलांना प्रशिक्षण
कौशल्य विकास कार्यक्रम : गोंडी पेंटिंग, साडी वर्क व एम्ब्रॉयडरीचा समावेश
सालेकसा : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हस्तशिल्प विकास आयुक्तांच्या आदेशान्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर हस्तशिल्प विकास योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रशिक्षण, उत्पादन, विपणन केंद्र सुरु होणार आहेत. याचा पहिला टप्पा म्हणजे प्रशिक्षणाचा असून त्यासोबतच उत्पादन व विपणन सुद्धा करण्याचे काम करण्यात येईल. यांतर्गत जिल्ह्यात पुढील एका वर्षात सात हजार २०० पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात तालुकावरस्तरावर केंद्र उभारण्यात येतील. याचे जिल्हा मुख्यालय सालेकसा येथे राहील अशी माहिती या योजेनेचे निदेशक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर उईके यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एकूण ५ प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येतील, असे एकूण आठ तालुक्यात ४० प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येत आहेत. एका केंद्रावर एका वर्षात १८० लोकांना प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणामध्ये गोंडी पेटींग, साडी वर्क आणि एम्ब्रायडरीचा समावेश असून कापड, केनवॉस आणि कागदावर गोंडी पेटींग बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच भिंतीवर सुद्धा गोंडी पेटींग बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. साडी वर्क अंतर्गत साडीवर वेगवेगळ्या प्रकारचे डिजाईन तयार करने, धागा वर्क इत्यादीच्या माध्यमातून साड्याना आकर्षक बनविण्याचे काम असते. एम्ब्रॉयडरी वर्क अंतर्गत कापडावर एम्ब्रॉयरडीच्या माध्यमातून वेगवेगवळ्या प्रकारच्या डिजाईन तयार करने, हँकरचिफ, बॅग, बेडशीट, टेबलक्लॉथ, पडदे इत्यादीवर डिजाईन काढण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर नवसृजन कल्पनेतून नवनवीन कलात्मक वस्तुंच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येईल.
प्रशिक्षण घेणाऱ्या महिला आपल्या स्तरावर आपल्या पद्धती आणखी काही इतर महिलांना सहज प्रशिक्षण देऊ शकतात. याचा सुद्धा अंदाज येत प्रधानमंत्री कौशल विकास कार्यक्रमांतर्गत येत्या २०२२ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील ८४ हजार महिला प्रशिक्षीत होऊ शकतात. आणि तसा लाभ सुद्धा निर्धारित करण्यात आलेला आहे.
प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रशिक्षणानंतर उत्पादनाचे काम असेल. तसेच त्याचे विपणन सुद्धा त्याच केंद्रावरुन करण्यात येईल. तिन्ही प्रकारच्या जबाबदाऱ्या संबंधित संस्थेच्या असून प्रशिक्षीत महिलांना उत्पादन असलेल्या आधारावर आर्थिक लाभ मिळेल. तयार केलेला माल सुद्धा बाजारात विक्री करण्याची धडपड व पायपीट न करता संस्थेचे निदेशक या मालाची उचल करणार व केंद्र शासनाच्या भारतीय जनजातीय कार्य मंत्रालय अंतर्गत विपणन केंद्राला विक्री करणार.
केंद्र शासनाचा विपणन केंद्रातून तो माल देश-विदेशात आपल्या स्तरावर निर्माण व विक्री करेल व ती जबाबदारी त्यांची राहील. त्याचप्रमाणे केंद्र शासनातील वस्त्र मंत्रालत आणि हस्तशील्प विकास विभागद्वारा केंद्रीय विपणन केंद्राला सुद्धा तयार केलेला नगदी भूगतानावर आधारित विपणन व्यवस्था करेल. अर्थात प्रशिक्षण उत्पादन आणि विपणन व्यवस्था एकमेकांशी निर्गमित असल्याने तयार केलेला माल विक्री करुन पैसे मिळणार अशी चिंता यात राहणार नाही.
प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांचा किंवा पुरुषांचा समूह स्वत:च्या केंद्र स्थापित करुन सुद्धा प्रशिक्षण उत्पादन व विपणन या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.(तालुका प्रतिनिधी)