१०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 20:54 IST2018-05-21T20:54:16+5:302018-05-21T20:54:16+5:30
कृषी विज्ञान केंद्र आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा, गोंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्रात १७ व १८ मे रोजी किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील १०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

१०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कृषी विज्ञान केंद्र आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा, गोंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्रात १७ व १८ मे रोजी किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी व वापर या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील १०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. आत्मा गोंदिया कार्यालयाचे सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ.व्ही.एस.साखरकर यांनी केले. आर.डी.चव्हाण यांनी शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करतांना घेण्यात येणारी काळजी व विषबाधा झाल्यावर करण्यात येणारे प्रथमोपचार या विषयांवर मार्गदर्शन केले.
एस.जी.पवार यांनी फवारणी यंत्राची निगा व काळजी यावर मार्गदर्शन केले. के.सी.गांगडे यांनी कीटकनाशकांमुळे मनुष्यावर होणारे दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन केले. संचालन एस.जी.पवार तर आभार के.सी.गांगडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आर.टेंभूरकर, जी.यु.काळुसे व एम.व्ही.भोमटे यांनी सहकार्य केले.