रेल्वेगाडीची प्रतिक्षा रेल्वे रुळावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 12:42 IST2017-10-23T12:38:01+5:302017-10-23T12:42:03+5:30
गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे.

रेल्वेगाडीची प्रतिक्षा रेल्वे रुळावरच

आॅनलाईन लोकमत
गोंदिया: गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे. काही प्रवासी ही प्रतिक्षा रेल्वे रुळावरच बसून करत असल्याचेही दृश्य येथे पहायला मिळते.
या मार्गावरून दररोज किमान १० ते १२ प्रवासी गाड्या धावता
खोडशिवनी हे गाव तसे नवीन नाही. ते स्वातंत्र् योत्तर काळातले असले तरी आता त्याला किमान ५० ते ६० वर्षांचा इतिहास आहे. या गावाला एक लहानसे रेल्वे स्थानक मिळावे अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.