केशोरी येथे बसस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:29+5:302021-02-06T04:53:29+5:30
केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने गाठून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेसला परत फिरविण्यासाठी ...

केशोरी येथे बसस्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी ()
केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने गाठून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेसला परत फिरविण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासन दुकानदारांचे हित जोपासून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी नागरिकांच्या मागणीप्रमाणे येथील ठाणेदारांनी बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची वाहतुकीची अडचण निर्माण झाली नाही. पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे काही व्यावसायिकांच्या पोटात दुखणे सुरू झाल्याने पोलिसांनी येथे सेवा अर्जीत करू नये म्हणून विरोध केला, तेव्हापासून पोलिसांनी सेवा देणे बंद केले. बसस्थानकावरील वाहतुुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे बसचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. बसस्थानक परिसरातील शासकीय जागेवर खासगी दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे दुकानात येणारे ग्राहक दुकानासमोर वाहने उभी करून परिवहन मंडळाच्या बसेसला अडचण निर्माण करतात. परिवहन मंडळाच्या बससेला परत फिरण्यासाठी जागा उपलब्ध राहत नाही. त्यामुळे दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. याप्रकरणी वास्तविक स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन खासगी व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे; परंतु ग्रामपंचायत प्रशासन दुकानदारांचे हित जोपासत वाहतुकीची कोंडी निर्माण करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्वरित येथील अतिक्रमण हटवून वाहतुकीची होत असलेली कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.