पारंपरिक व्यवसाय धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:58 IST2019-04-27T21:58:11+5:302019-04-27T21:58:43+5:30
प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे. यामुळे पारंपरिक साधन मागे पडत असून सुतार, चांभार, कुंभार, लोहार या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

पारंपरिक व्यवसाय धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रगत तंत्रज्ञानामुळे आधुनिक साधनांचा बदलत्या जीवनशैलीत वापर वाढत आहे. यामुळे पारंपरिक साधन मागे पडत असून सुतार, चांभार, कुंभार, लोहार या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. पूर्वीच्या बलुतेदार पद्धतीवर अवकळा आल्याने कारागिरांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वीच्या काळी सुतार, लोहार, कुंभार यांना शेतकऱ्यांच्या जीवनात विशेष स्थान होते. सुतार हा शेतीसाठी लागणारे वखर, नांगर, दरवाजे बनवून द्यायचे. आता हे साहित्य लोखंडी स्वरूपात मजबूत प्रकारात बाजारात मिळत असल्याने त्याचा परिणाम लोहार कारागिरांच्या व्यवसायावर होत आहे. पारंपरिक पद्धतीने कातड्यावर प्रक्रि या करु न पादत्राणे तयार केले जायचे. पद्धतीनुसार चपला, जोडे बाजारात उपलब्ध झाल्याने या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कुंभार मातीला एकजीव करून माठ, सुरई, पणत्या, रांजण तयार करून आपला उदरनिर्वाह चालवित असे. आता या व्यवसायाला देखील उतरती कळा लागली असून या व्यवसायिकांना आता शासकीय मदतीची गरज आहे.
बाजारपेठेत आधुनिक तंत्राचा व यांत्रिक पद्धतीने बनविलेल्या साधनांनी शिरकाव केल्याने या पारंपरिक व्यवसायिकांनी बनविलेल्या साहित्याला आता विशेष मागणी नाही. जागतिकीकरणात ग्रामीण भागातही या वस्तू सहजरित्या उपलब्ध होत असल्याने या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागात तर कुंभाराचे चाक बंद होण्याच्या मार्गावर आहे. तप्त आगीत लोखंडाला आकार देऊन ग्रामस्थांना पावशी, कुºहाड, विळा तयार करणाºया लोहार समाजावर आधुनिकतेमुळे व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. या व्यावसायिकांना आता कामाच्या शोधात शहरात भटकंती करावी लागत आहे. त्यांना प्रशिक्षणातून तंत्रज्ञानाची ओळख करून दिल्यास व्यवसायाला संजीवनी मिळेल.
उदरिनर्वाहाचे साधन हरवले
ग्रामीण भागात वडिलोपार्जीत व्यवसाय करणाºया कारागिरांवर कालौघात उपासमारीची वेळ आली आहे.या कारागिरांमधील कला जिवंत ठेवण्यासाठी शासनाने प्रभावीपणे उपाय योजना राबविण्याची मागणी होत आहे.
व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी आवश्यक प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करु न देण्याची गरज व्यक्त होत आहे. नामशेष होणाºया या कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुन देत व्यवसायाला उभारी देण्याची मागणी आहे.