गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम
By Admin | Updated: November 1, 2016 01:09 IST2016-11-01T01:09:34+5:302016-11-01T01:09:34+5:30
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे गायगोधन. या दिवशी लोक मोठ्या आस्थेने गोवर्धन पूजा करतात.

गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम
बाराभाटी : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे गायगोधन. या दिवशी लोक मोठ्या आस्थेने गोवर्धन पूजा करतात. लोककलेची संस्कृती आणि आस्थेने दर्शन यावर्षीही गोवर्धन पुजेच्या निमित्ताने ग्रामीण भागात पहायला मिळाले.
ही पूजा ग्रामीण भागात प्रामुख्याने केली जाते. या पूजेला सर्व गावातले गोमाता, गाय, बैलांचे शेण गोळा करून गावातील आकरावर मध्यभागी जमा होतात. या शेणामध्ये जीवंत कोंबडीचे पिल्लू ठेवले जाते. त्यानंतर मातीचे बैल, गाय, म्हैस, शेळी प्राणी तयार करून गोवर्धन पूजेच्या ठिकाणी एकत्र करतात. नंतर भूत गांजा नावाचे गवत वनस्पती ठेवतात. सायंकाळच्या सुमारास सर्व गावकरी गावातील गुरे-ढोरे त्या शेण, गवतावरून नेताना शेण (गोवर्धन) पूजन केली जाते. यावरून सर्व गुरे हाकलली जातात.
सांस्कृतिक लोककला प्रकार दंडार नृत्य या ठिकाणी सादर केले जाते. यातून मनोरंजनाबरोबर प्रबोधन केले जाते. याच्या ओळी, गाण, गीत यामध्ये कथा, पथनाट्य सादर केली जातात.
अशाच प्रकारे सर्व ग्रामीण भागामध्ये गोवर्धन पूजेची परंपरा असते. या दिवसापासून खेड्यापाड्यामध्ये मंडई या कार्यक्रमाचे आयोजनाला सुरूवात होते. यादरम्यान नाटकाचे आयोजन केले जाते. दंडारीचे आयोजन केले जाते, एक सामाजिक संकल्प बांधून एकोपा निर्माण करणे हा महत्वाचा भाग आहे. हीच समाज संस्थेची खरी संपत्ती समजली जाते.
यावर्षी शेतकरी चिंताग्रस्त आहे, धानाला भाव नाही, धान पिक चांगले नाही, दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह नसला तरी या सणाची परंपरा यावर्षीही कायम होती. गोंदियात शहरालगत गोविंदपूर, छोटा गोंदिया परिसरात गायगोधनादरम्यान हेल्यांची स्पर्धा झाली.