ट्रॅक्टर ट्रॉली उलटून तेंदूपत्ता मजूर ठार

By Admin | Updated: June 10, 2015 00:43 IST2015-06-10T00:43:15+5:302015-06-10T00:43:15+5:30

तेंदूपत्त्याचे बोद धुलाई करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर उलटल्याने त्यावर असलेला ..

The tractor trolley reversed the murder of the laborer laborers | ट्रॅक्टर ट्रॉली उलटून तेंदूपत्ता मजूर ठार

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून तेंदूपत्ता मजूर ठार

बोंडगावदेवी : तेंदूपत्त्याचे बोद धुलाई करण्यासाठी जात असलेला ट्रॅक्टर उलटल्याने त्यावर असलेला मजूर रामू शंकर मानकर (४२) ठार झाला. हा अपघात सोमवारी दुपारी घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावातील तीन ट्रॅक्टर तेंदुपत्ता पानाचे बोद धुलाई करण्यासाठी दवडीपार, माडगी तेंदुपत्ता युनिटमधील पोहरा भागात येथील मजुरांसह गेले होते. बोद मांडायला जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीसह गराडा गावाच्या परिसरात एकाएकी उलटला. यावेळी ट्रॉलीमध्ये बसलेला रामू मानकर जागीच ठार झाला. सोमवारी दुपारी १.३० वाजतादरम्यान हा अपघात घडला.
ज्या ट्रॅक्टरवर रामू बसला होता तो ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचा होता याबाबत गावात अनेक चर्चा रंगत आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीखाली रामू दबला असताना त्याचे सहकारी मात्र इतरत्र पळून गेल्याचे गावात बोलल्या जाते. १.३० वाजेच्या दरम्यान अपघात होऊनसुध्दा त्यांच्या पत्नीला व नातलगांना सायंकाळी बातमी सांगण्यात आली. रामू मानकर यांचा मृतदेह शवचिकीत्सा करून गावात मंगळवारी १२ वाजता आणून स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. (वार्ताहर)

तिसऱ्याही भावाचा अपघाती मृत्यू
गावातील शंकर मानकर यांना ३ मुले होते. रामू, लक्ष्मण व सुरेश अशी त्यांची नावे. त्यांनी मोलमजुरी करून मुलांचा सांभाळ केला. १० वर्षापुर्वी दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा लक्ष्मण याचा बकऱ्या धुताना तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला. सर्वात लहान सुरेश याचा गावातील रमाई चौकात ट्रकने धडक मारल्याने ४ वर्षापूर्वी मृत्यू झाला, आता सर्वात मोठा रामू याचा ट्रॅक्टर अपघातामध्ये ८ जून रोजी मृत्यू झाला. तीनही मुलांचे अपघाती मृत्यू झाल्याने शंकर मानकर यांच्यासह संपूर्ण मानकर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावात आणि परिसरात याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: The tractor trolley reversed the murder of the laborer laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.