नायब तहसीलदारावर चालविला ट्रॅक्टर
By Admin | Updated: April 25, 2017 00:47 IST2017-04-25T00:47:41+5:302017-04-25T00:47:41+5:30
रेती चोरून नेणाऱ्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नायब तहसीलदाराला रेती माफीयाने अंगावर ट्रॅक्टर चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

नायब तहसीलदारावर चालविला ट्रॅक्टर
गोंदिया : रेती चोरून नेणाऱ्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या नायब तहसीलदाराला रेती माफीयाने अंगावर ट्रॅक्टर चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारच्या सकाळी ६ वाजतादरम्यान घडली.
या संदर्भात नायब तहसीलदार अखिलभारत रमेश मेश्राम (३४) रा.सडक-अर्जुनी यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीवरून त्या ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परसोडी येथील स्वप्नील मधुकर भाजीपाले हा रविवारी सकाळी ६ वाजता पिपरी रेती घाटावरून रेती चोरून नेत होता. त्याच्या ट्रॅक्टरला नायब तहसीलदार मेश्राम यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर चालविण्याचा प्रयत्न केला. ते बाजूला झाल्याने सुदैवाने थोडक्यात बचावले. या प्रकाराविरूद्ध मेश्राम यांनी तक्रार केल्यानंतर भाजीपालेविरूद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७, ३७९, १८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.