डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:18+5:302021-02-05T07:48:18+5:30

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी धानाचीच लागवड करतो. या धानाच्या शेतीत बियाणे पेरण्यापासून तर रोवणी होपर्यंत विविध घटकासाठी शेतकऱ्यांना एकरी ...

Tractor cultivation also becomes more expensive due to increase in diesel price (dummy) | डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली (डमी)

डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली (डमी)

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी धानाचीच लागवड करतो. या धानाच्या शेतीत बियाणे पेरण्यापासून तर रोवणी होपर्यंत विविध घटकासाठी शेतकऱ्यांना एकरी ५ हजारांच्या घरात खर्च येतो; परंतु त्यातून मिळकत ही कमी असल्याने आज शेती परवडणारी नाही. आजचा शेतकरी पारंपरिक शेतीला सोडून तंत्रज्ञानाची कास धरत आहे; परंतु या तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या साधनांचा खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे परडवत नाही. परिणामी, दरदिवशी शेतकऱ्यांच्या अंगावर कर्जाचे ओझे असते. आता डिझेलची किंमत ८२ रुपयांवर गेल्याने शेतीची मशागत करणाऱ्या ट्रॅक्टरचेही मशागतीचे दर वाढविले. परिणामी, डिझेल वाढीचा मार शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० रुपये लिटरने डिझेल महागले; परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकरी २०० रुपये फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मागच्या वर्षी एक एकर शेतीची नांगरणी करण्यासाठी १४०० रुपये घेतले जात होते; परंतु यंदा याच एकर शेतीसाठी १६०० रुपये घेतले जात आहेत. नांगरणी करण्यापासून बियाणे पेरणे, चिखल करण्यासाठी रोटा लावण्याचे हे सर्व कामे एक एकरात केले तर त्याचा खर्च एकरी ५ हजारांच्या घरात जात आहे.

बॉक्स

डिझेलचे दर वाढण्याने साहजिकच मशागतीचे दर वाढवावे लागतील. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा तासाला १०० रुपये मशागतीचे दर वाढविण्यात आले आहेत. डिझेलच्या किमतीत १० रुपये लिटरने वाढ झाली आहे. त्यामुळे मशागतीची दरवाढ स्वाभाविक आहे.

-राजेश शेंडे, ट्रॅक्टर मालक

........

कोट

शेतीत मशागत करण्यासाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर तासभर नांगरणी करण्यासाठी ८०० रुपये मोजावे लागतात. शेती करण्यासाठी लागणाऱ्या संसाधनांच्या अधिक किमती, मजुरीही अधिक आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर होत आहे.

-चंद्रकुमार हुकरे, शेतकरी, पदमपूर.

.........

कोट

अल्पभूधारकाला ट्रॅक्टर घेता येत नाही आणि आपली जमीन कसण्यासाठी ट्रॅक्टर लावला तर तासाभरासाठी ८०० रुपये मोजावे लागतात. एक एकर शेती नांगरणी करायला कमीत-कमी दोन तास लागतात. फक्त नांगरणी करायला १६०० रुपये लागतात. त्यामुळे शेती परवडत नाही.

-कुसन कोरे, शेतकरी

.......

एकरी शेतासाठी ५ हजारांचा खर्च

१) नांगरणी, बियाणे परणे, चिखल करणे यासाठी रोटा व ट्रॅक्टरचा वापर केला जातो. यासाठी एकरी ५ हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.

२) मागच्या वर्षी ७२ रुपये असलेले डिझेल यंदा ८२ रुपयांच्या घरात गेले. डिझेल दहा रुपये प्रतिलिटर वाढले; परंतु मशागतीचे दर १०० रुपये तासाने वाढले आहे.

३) शेतीच्या कामात येणारी जनावरे कत्तलखान्यात रवाना झाली. कमी वेळात अधिक काम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढला; परंतु या साधनांसाठी खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, मिळणारा भाव कमी आहे.

...............

मशागतीचे दर (प्रति एकर)

नांगरणी- १४००

१६००

रोटा- १८००

१८००

खुरटणी - १४००

१६००

नांगरणी, रोटा- ३२००

३४००

पेरणी- १४००

१६००

Web Title: Tractor cultivation also becomes more expensive due to increase in diesel price (dummy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.