गोंदिया जिल्ह्यात ट्रॅक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सची धडक; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:23 PM2020-06-20T12:23:20+5:302020-06-20T12:23:44+5:30

गोंदिया जिल्ह्यात आमगावर मार्गावर असलेल्या ग्राम ठाणा गोरेगाव वळणावर शुक्रवारी रात्री ८ वाजता ट्रॅक्टर आणि मिनी एंबुलेंसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली.

Tractor-ambulance crash in Gondia district; Four injured | गोंदिया जिल्ह्यात ट्रॅक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सची धडक; चार जखमी

गोंदिया जिल्ह्यात ट्रॅक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सची धडक; चार जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: आमगावर मार्गावर असलेल्या ग्राम ठाणा गोरेगाव वळणावर शुक्रवारी रात्री ८ वाजता ट्रॅक्टर आणि मिनी एंबुलेंसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
ही धडक इतकी भीषण होती की, मारुती ओम्नी मिनी एंबुलेंस गाड़ी क्रमांक एमएच- 49/बी के-1522 च्या ड्राइवरसाइडचा हिस्सा क्षतिग्रस्त होऊन गाड़ी चालकाच्या पायाला मोडला गेला. अपघातग्रस्त वाहन सहयोग नेत्रालयाची आहे. अपघातात ट्रैक्टर चालकासह चार व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमगांव पोलीस निरीक्षक श्याम काळे यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती दिली व अपघाताची नोंद केली आहे, घटनेचा तपास सुरू केले आहे.

Web Title: Tractor-ambulance crash in Gondia district; Four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात