सात्याच्या भाजीतून तिघांना विषबाधा
By Admin | Updated: September 5, 2016 00:16 IST2016-09-05T00:16:05+5:302016-09-05T00:16:05+5:30
सात्याची भाजी खाल्याने विषबाधा होऊन तिघांना रूग्णालयात भर्ती करण्याची पाळी आली. जवळील ग्राम बिरसी येथे शनिवारी (दि.३) रात्री ही घटना घडली.

सात्याच्या भाजीतून तिघांना विषबाधा
बिरसी येथील घटना : रूग्णालयात केले दाखल
खातीया : सात्याची भाजी खाल्याने विषबाधा होऊन तिघांना रूग्णालयात भर्ती करण्याची पाळी आली. जवळील ग्राम बिरसी येथे शनिवारी (दि.३) रात्री ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, सत्यभामा बुधराम वंजारी (६५) यांनी शनिवारी शेतातून सात्या (मशरूम) आणले व रात्री त्याची भाजी बनविली. ही भाजी सत्यभामा यांच्यासह त्यांचा मुलगा सुरेंद्र बुधराम वंजारी (४०) व मुलगी सिमा संतोष मडामे (४२) यांनी खाल्ली. मात्र जेवणाच्या काही वेळानंतर त्यांना उल्टी झाली व त्यांची प्रकृती खालावू लागली. यावर शेजारच्यांनी त्यांना मध्यरात्री १ वाजतादरम्यान गोंदियाच्या केटीएस रूग्णालयात भर्ती केले.
मात्र यातील सुरेंद्र वंजारी यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना रविवारी (दि.४) सकाळी ११ वाजतादरम्यान सुट्टी देण्यात आली. तर सत्यभामा व सिमा यांना सायंकाळी सुटी दिली जाणार असल्याचे कळले. (वार्ताहर)