बांध तलावावर पर्यटनस्थळ
By Admin | Updated: December 31, 2014 23:27 IST2014-12-31T23:27:10+5:302014-12-31T23:27:10+5:30
गोंदिया शहरातील एका भागासाठी नेहमीच समस्येचे कारण ठरलेला बांध तलाव आता या परिसरातील नागरिकांसाठी आशेचे कारण ठरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या

बांध तलावावर पर्यटनस्थळ
गोंदिया : गोंदिया शहरातील एका भागासाठी नेहमीच समस्येचे कारण ठरलेला बांध तलाव आता या परिसरातील नागरिकांसाठी आशेचे कारण ठरत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या पुढाकाराने भविष्यात बांध तलावाच्या सौंदर्यीकरणावर ७५ लाख रूपये खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. परंतु सदर प्रस्ताव देण्यासाठी सध्या सुरू असलेले ५९ लाख रूपये खर्चाचे काम पूर्ण होण्याची वाट पहावी लागणार आहे.
गोंदिया शहरात मनोरंजनाचे कोणतेही साधन नाही. एवढ्या मोठ्या शहरात एकमात्र सुभाष बगिचा आहे. येथे नेहमी नागरिकांची गर्दी दिसून येते. परंतु हे स्थळसुद्धा सामान्य नागरिकांच्या आशा-आकांशांची पूर्तता करीत नाही. शहरातील जनतेच्या मनात उठणारे प्रश्न जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना मनासुद्धा उठले. मागील काही वर्षांपूर्वी जेव्हा सूर्याटोला येथील बांध तलावाच्या पुराने शहरात विनाशलिला पसरविली होती. काही काळापूर्वी याच परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने निधीसुद्धा मंजूर केला. या दरम्यान बांध तलावाचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी सैनी गेले. त्यावेळी शहराशी लागूनच असलेला एवढा मोठा तलाव पाहून त्यांना आश्चर्य झाले. त्याचवेळी त्यांच्या मनात या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचा विचार निर्माण झाला.
त्यांनी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाचे संबंधित कनिष्ठ अभियंता यांना एक प्रस्ताव तयार करण्याचा तोंडी आदेश दिला होता. उल्लेखनिय म्हणजे या आदेशानंतर तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ७५ लाख रूपये खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. नवीन प्रस्तावांतर्गत या तलावात भविष्यात नाव चालविली जावू शकते. येथे हिरवे वृक्ष लावण्यात येतील. बांध तलावाचे सौंदर्यीकरणसुद्धा होईल. नागपूर जिल्ह्यातील खिंडसीप्रमाणेच याचे विकास करण्याचा पुढाकार प्रस्तावाच्या माध्यमातून घेण्यात येईल. हे गोंदिया शहरासाठी एक मोठे उपहार ठरण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत या क्षेत्रात दरदिवशी जवळपास २०० नागरिक मार्निंग वॉकसाठी येतात. जर येथे सर्वकाही उपलब्ध होईल तर शहरातील नागरिकांसाठी ही मोठ्याच आनंदाची बाब ठरेल. परंतु हे सर्व मोफत मिळणार नाही. त्यासाठी थोडासा शुल्क द्यावा लागेल. एखाद्या कंत्राटदारावर या तलावाचे सौंदर्यीकरण करणे व त्या सौंदर्याला टिकवून ठेवण्याची जबाबदारी सोपविली जावू शकते. दिवसभर कामांच्या ओझ्यामुळे त्रस्त झालेल्यांना हे स्थळ शांती व आनंद प्रदान करण्यास यशस्वी ठरेल.
या ठिकाणी आता सध्या गेट बनविले जात आहेत. वेस्टवेअरचे बांधकाम केले जात आहे. तलावाची पिचिंग सुरू आहे. तलावाच्या पाळीला मजबूत केले जात आहे. आपल्या वाहनांसह नागरिकांचे येथे ये-जा करण्याचे प्रयत्न सार्थक होवू लागले आहेत. आतापासूनच हे परिसर शहरातील नागरिकांना आकर्षिक करीत आहे. (प्रतिनिधी)