फिरत्या लोकअदालतीचा शुभारंभ

By Admin | Updated: March 12, 2016 02:01 IST2016-03-12T02:01:54+5:302016-03-12T02:01:54+5:30

फिरते कायदेविषयक सारक्षता शिबीर व लोकअदालतीचा शुभारंभ जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर

Touring public debut | फिरत्या लोकअदालतीचा शुभारंभ

फिरत्या लोकअदालतीचा शुभारंभ

सावरी येथे पहिली लोकअदालत : नऊ प्रकरणांत करण्यात आली तडजोड
गोंदिया : फिरते कायदेविषयक सारक्षता शिबीर व लोकअदालतीचा शुभारंभ जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर यांच्या हस्ते फिरत्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. या महिन्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीर व लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी न्यायाधीश माधूरी आनंद, ए.एच.लढ्ढा, सी.पी.चौधरी, इशरत ए शेख-नाझीर, आर.डी.भुयारकर, एस.एल.रामटेके, पी.व्ही.खंडारे, एस.ए.इंगळे, एस.एम.एच.शाहीर, ए.एस.जरूडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव पी.एच.खरवडे, अ‍ॅड.मंगला बंसोड, प्रा.उमेश उदापूरे, सविता बेदरकर, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी तसेच जिल्हा न्यायालयातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता.
ग्राम सावरी येथे पहिल्या दिवशी फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीर व लोकअदालत घेण्यात आली. सेवानिवृत्त न्यायाधीश सी.पी.चौधरी याच्या अध्यक्षतेत घेण्यात आलेल्या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून ईशरत ए शेख, प्रा.उदापूरे, सविता बेदरकर, पीएसआय. शेवते, सरपंच डुलेश्वरी पटले, माजी सरपंच झनक पटले, तंटामुक्त समिती अध्यक्ष पटले उपस्थित होते. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी कौटूंबीक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, जेष्ठ नागरिक कायदा, कामगार कायदा, महितीचा अधिकार कायदा या विषयांवर मार्गदर्शन केले. येथील लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबीत असलेली आठ व एक पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरण ठेवण्यात आले होते. पक्षकारांमध्ये तडजोड घडवून आणण्याकरिता लोकअदालतीचे पॅनल प्रमुख चौधरी, पॅनल सदस्य मंगला बंसोड, सविता बेदरकर, प्रा.उदापुरे यांनी प्रयत्न केले. संचालन टेकचंद चिखलोंडे यांनी केले.

Web Title: Touring public debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.