व्हिडिओ दाखविण्याची धमकी देत अत्याचार
By Admin | Updated: June 13, 2016 00:13 IST2016-06-13T00:13:15+5:302016-06-13T00:13:15+5:30
नजरेवर नजर पडली आणि दोघांत प्रेम निर्माण झाले. दोघांच्या प्रेमाचा प्रवास चार वर्षाचा झाल्यावर तरूण व्यसनी, ...

व्हिडिओ दाखविण्याची धमकी देत अत्याचार
पोलिसांत तक्रार : सहा वर्षांपासून होते प्रेमसंबंध
गोंदिया : नजरेवर नजर पडली आणि दोघांत प्रेम निर्माण झाले. दोघांच्या प्रेमाचा प्रवास चार वर्षाचा झाल्यावर तरूण व्यसनी, जुगारी व गुंडगर्दी करतो असे त्या तरूणीला माहिती पडल्यावर तिने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने त्या तरूणीची तयार केलेली अश्लील व्हिडिओ समाजात दाखविल अशी धमकी देत मारहाण करीत वारंवार अत्याचार केला. नाईलाजाने त्या पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला आरोपी संदीप नीलकंठ सिक्का (२७, रा. यादव चौक, गोंदिया) याने सहा वर्षापूर्वी प्रेमात फासले. मात्र काही दिवसांनी तो व्यसनी असून जगार खेळतो व मारामारी करतो याबाबत तरूणीला माहिती मिळाली. यावर त्या तरूणीने संदीपपासून दूर होण्याचा विचार मागील दोन वर्षापूर्वी केला. परंतु प्रेमप्रकरणातून त्याने त्या मुलीशी केलेल्या कृत्याची व्हिडीओ तयार केले. तसेच संबंध ठेवले नाही तर व्हिडिओ संपूर्ण गोंदियाभर दाखविल अशी धमकी दिली. शनिवारी पुन्हा त्याने तेच कृत्य केले. तरुणीची व्हिडिओ समाजात पसरविल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरूध्द त्या मुलीने गोंदिया शहर पोलिसांत तक्रार केली. सदर घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (१), ४१७, ४५२, ३५४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.