तिरोड्याचा कृषी विभाग रिक्त पदांमुळे पांगळा
By Admin | Updated: March 31, 2015 01:30 IST2015-03-31T01:30:17+5:302015-03-31T01:30:17+5:30
शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त

तिरोड्याचा कृषी विभाग रिक्त पदांमुळे पांगळा
सहसंचालकांचे दुर्लक्ष : ११ पदे रिक्त, दीड वर्षापासून दोन्ही मंडळ प्रभारावर
तिरोडा : शासनाचा सर्वाधिक भर शेतकरी व शेती विकासाकडे असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या विकासाकरीता जलयुक्त शिवार अभियानासारख्या योजना नव्याने सुरु केल्या आहेत. मात्र योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल, असा प्रश्न उपस्थित आहे.
तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत ७ पदे आधीपासूनच रिक्त आहेत. तालुका कृषी कार्यालयांतर्गत दोन मंडळ कृषी कार्यालय मुंडीकोटा आणि तिरोडा आहेत. कृषी सहायकाचे एकूण पदे २४, सुपरवायजर (पर्यवेक्षक) ५ आणि कार्यालय कृषी सहायक १ आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी वर्ग आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून तिरोडा तालुका कृषी विभागाकडे कृषी सहसंचालकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
दीड-दोन वर्षात मुंडीकोटा आणि तिरोडा मधील दोन्ही मंडळ कृषी अधिकारी, सेवानिवृत्त झालेले आहेत. तेव्हापासून दोन वर्ष लोटून सुद्धा मंडळ कृषी अधिकाऱ्यांची व्यवस्था तिरोउज्ञ येथे कृषी सहसंचालकानी केलेली नाही. आज ही दोन्ही मंडळ प्रभारावर चालत आहेत.
तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांचे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त पडून आहे. गेल्या सहा महिन्यापासून अर्जुनी, परसवाडज्ञ सहित तीन कार्यक्षेत्र कृषी सहायक विणा प्रभारावर चालत आहेत. एका सहायकाकडे तीन ते ५ गावे असताना दुसऱ्या सहायकाचे पुन्हा ५ गावे प्रभारावर दिल्याने त्या सहायकाची कोणती अवस्था होत असेल आणि ते सहायक शेतकऱ्यांना किती सेवा देत असतील याचा मंथन खुद कृषी विभागाच्या आळा अफसरांनी करायला पाहिजे.
पुर्वीचेच सात पदे रिक्त असताना २०१४ मध्ये सहा कृषी सहायकाचे स्थानांतरण करण्यात आले. नव्याने एकही कृषी सहायक पाठविले नसल्याने तिरोडा कृषी विभागाने त्या स्थानांतरीत कृषी सहायकांना सोडले नव्हते. मात्र नागपूर विभागाने सहसंचालकांना स्थानांतरीत कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने २८ फेब्रुवारीला सहा कृषी सहायकांना तिरोडा तालुका कृषी विभागातून कार्यमुक्त केले आहे.
कार्यमुक्त केलेल्या सहायकामध्ये तीन महिला सहायकांचा समावेश आहे. तिरोडा तालुका कृषी विभागात कृषी सहायकांची ९ पदे रिक्त झाली आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांची दोन पदे अशी एकूण १२ पदे रिक्त असून तालुका कृषी विभाग एक प्रकारचा अपंग झाला आहे. (प्रतिनिधी)
आधीच कमतरता, त्यात स्थानांतर
जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करण्याकरीता कृषी विभागात कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांना स्थानांतरीत करुन विकासात्मक कामात एक प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात आला आहे. कृषी विभागाकडे जलशिवाराव्यतिरिक्त असणारे अन्य उपक्रम पूर्ण करण्याकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार आहे. कृषी सहसंचालकांशी ज्या पद्धतीने स्थानांतरित करण्याचे आदेश निर्गमित केले, त्यानुसार त्या जागा भरण्याची काळजी तातडीने घेणे गरजेचे आहे.
कामाचा व्याप अधिक असला तरी सहकार्याच्या भावनेने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आतापर्यंत स्थानांतरित कर्मचाऱ्यांना थांबविण्यात आले होते. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्ययुक्त करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची जबाबदारी आपली नसून विभागाची आहे.
- पी.व्ही. पोटदुखे
तालुका कृषी अधिकारी, तिरोडा.